तीन वेळचा आयपीएल विजेता चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनीला वेगाने धावा घेण्यासाठी ओळखले जाते. परंतु सोमवारी (१९ ऑक्टोबर) राजस्थानविरुद्ध झालेल्या सामन्यात सेट झालेला धोनी धावबाद झाला.
नाणेफेक जिंकून चेन्नईने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नई संघाची सुरुवात खराब झाली. त्यांचे धडाकेबाज ४ खेळाडू ५४ धावांतच तंबूत परतले. परंतु त्यानंतर धोनी फलंदाजीला आला. तो एका बाजून संघाचा डाव पुढे घेऊन जात होता.
यादरम्यान झाले असे की, राजस्थानचा गोलंदाज कार्तिक त्यागी १८ वे षटक टाकत होता. त्याच्या षटकातील चौथ्या चेंडूवर धोनीने लाँग-ऑफच्या दिशेने फटका मारला. तिथे जोफ्रा आर्चर क्षेत्ररक्षण करत होता. हा फटका मारल्यानंतर धोनीने सावकाश एक धाव घेतली. परंतु आर्चरच्या हातून चेंडू निसटल्यामुळे धोनी दुसऱ्या धावेसाठी धावला. परंतु आर्चरने लगेच चेंडू यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या दिशेने फेकला आणि सॅमसनने क्षणाचाही विलंब न करता धोनीला धावबाद केले.
https://twitter.com/watsonmpaul/status/1318213782057922569
https://twitter.com/dev_basrani/status/1318217119901700096
#CSKvsRR #dhoni200 #runout @msdhoni heart break for #fans in #MSD200thiplmatch 💔 pic.twitter.com/ptna23r3yZ
— Abhishek Jha (@_wabi_sabi___) October 19, 2020
धोनीने २८ चेंडूत २८ धावा केल्या. यामध्ये केवळ २ चौकारांचा समावेश होता.
आयपीएल २०२० मधील धोनीची कामगिरी पाहिली, तर त्याने १० सामने खेळताना केवळ १६४ धावा केल्या आहेत. सोबतच चेन्नई संघालाही या हंगामात फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये केवळ ३ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर उर्वरित ६ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सचे स्टार खेळाडू किती कमाई करतात एकदा पहाच…
-चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स: पराभवानंतरही चेन्नईच्या खेळाडूंनी ‘हे’ विक्रम केले नावावर
ट्रेंडिंग लेख-
-कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून
-आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’