धर्नुविद्या हा खेळ तसा रामायण-महाभारत काळापासून. महाराष्ट्रात हा खेळ अनेक वर्षांपासून खेळला जातो. राष्ट्रीय स्तरावर मराठी पाऊल नेहमीच मागे पडायचे. हा धर्नुविद्या म्हणजेच आर्चरी खेळातील दुष्काळ संपुष्टात आणला तो पुण्याजवळील तळेगाव ढमढरेमधील स्वप्नील ढमढेरेने. सतत संघर्ष करीत स्वप्नीलने राष्ट्रीय चॅम्पियनचा पल्ला पार केला आहे. महाराष्ट्रातील अनेक वर्ष अर्चरीतील खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत मागे पडायचे. स्वप्नील हा पायंडा बदलला. म्हणूनच की काय तब्बल दशकानंतर अर्चरी खेळासाठीचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार त्याला घोषित झाला.
स्वप्नील हे क्रीडारत्न 25 फेंब्रुवारी 1990 रोजी बाळासाहेब ढमढेरे यांच्या घरी अवतरले. तसं घरात राजकारणाचे वातावरण. घरात सतत राजकीय मंडळींचे वर्दळ. वडिलांच्या प्रसार रॅलीत स्वप्नील सहभागी व्हायचा. पण तो रमला मैदानात. जिल्हा परिषदेच्या शाळेत तो खो-खो खेळायचा. सातवीपासून व्हॉलीबॉल खेळातही तो चमकला. शाळेत गुरूजी शिवरायांच्या गोष्ट सांगताना तो रमून जायचा. तलवार, धनुष्यबाणाने महाराजांची युध्द जिंकले असे सांगतल्यानंतर तो गुरूजींना प्रश्न करायचा, सर आता धनुष्यबाण कोठे मिळेल. कधी कधी झाडांच्या फांद्या तोडून तो धनुष्य करायचा आणि खराटाच्या काडया त्यांच्यासाठी बाण असत.
क्रिकेटची त्याला भारी आवड होती. हातात चेंडू येताच तो त्रिफळा उडवायचा. अचून गोंलदाजी करणारा स्वप्नील हा गीलवरनेही अचूक नेम घ्यायचा. जत्रेत बंदूकीने फुगे फोडण्याची त्याला हौस असायची. दगडाने नेम धरून कैर्या पाडणे, लंगोरी खेळताना दगड पाडणे यात तो तरबेज होता. नेम धरण्याचा खेळ त्याचा रक्तातच होता. मात्र आर्चरीचा धर्नुष्य-बाण हाती येण्यासाठी त्याला शर्थ करावी लागली.
महाविद्यालयात असताना क्रीडा संचालक अमेय काळे यांच्याकडून स्वप्नीलला धर्नुविद्या खेळ सर्वप्रथम स्पर्धात्मक असल्याचे कळले. काळे यांच्याकडूनच प्रशिक्षक रणजीत चामले यांच्याशी स्वप्नीलची नाळ जुळली गेली. रणजीत सरांनी स्वप्नीलला तावून सुलाखून राज्य विजेता आर्चरी क्रीडापटू घडवले. चामले सरांच्या मार्गदर्शनामुळे त्याच्या जीवनाची दिशा बदलली. महाविद्यालयात टवाळ विद्यार्थी असणारा स्वप्नील मैदानात घाम गाळताना दिसू लागला. तसा तो प्रगतीशील शेतकरी कुंटुबातील. ऊसाच्या शेताच्या बांध्यावर तो अर्चरीचे टारगेट ठेवून सराव करायचा. तेव्हा आता हे काय नवं खुळे अशी त्याची चेष्ठा गावभर झाली. घरातूनही या धनुष्य बाण खेळाला पूर्ण पाठिंबा नव्हता.
कारकिर्दीतील पहिल्या स्पर्धेत स्वप्नीलला दारूण पराभवास समोरे जावे लागले. जुना कंम्पाऊंड धनुष्य हाती घेऊन तो प्रथम सोलरपूरच्या स्पर्धेत खेळला. तो पहिल्या दहा खेळाडूंमध्येही त्याचा क्रमांक नव्हता. त्यात खेळताना महागडे बाण तुटले होते. सहा महिन्यात कुरूक्षेत्र येथील विद्यापीठ स्पर्धेत स्वप्नीलला चमकला. सांघिक पदक जिंकून त्याने पदकाचा श्रीगणेशा केला. या यशानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. विद्यापीठ पाठोपाठ राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत त्याचा पदकाचा झंझावात सुरू झाला. महाराष्ट्रात तर तो अव्वल धर्नुधर बनला. तो गुणांचे नवे शिखर सर करीत राहिला. स्वतःचे विक्रम मोडित राहिला. राज्य स्पर्धा आणि स्वप्नीलचे सुवर्णपदक असे समीकरण बनून गेले.महाराष्ट्र धनुर्विधा टीम चा माघील सहा वर्षे कॅप्टन म्हणून काम करत आहे, राज्य पातळीवर 20 पदके प्राप्त, त्यातली 18 सुवर्ण पदके, देश पातळीवर 5 पदके प्राप्त, पोलंड येथे देशा कडून खेळण्यासाठी निवड, सलग 6 वेळा पुणे चा टीम कडून महाराष्ट्र पातळीवर चॅम्पियन असणारा 1एकमेव खेळाडू सलग 3 वेळा महाराष्ट्र मध्ये चॅम्पियन होणारा पहिला खेळाडु सलग सहा वेळा सुवर्णपदक जिंकण्याचा नवा उच्चांक त्याने राज्य स्पर्धेत करीत दोन वेळा सुवर्ण हॅटट्रिकचा पराक्रम नोंदविला आहे.
राज्यात अव्वल असणारा स्वप्नील देशातही सतत पुढेच राहिला. राष्ट्रीय स्पर्धेत 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य अशी त्याची चमकदार कामगिरी आहे. तुर्की, चीन येथील जागतिक स्पर्धेतही त्याने देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. या चढत्या कमानी कामगिरीच्या जोरावर तो दशकानंतर महाराष्ट्रातील पहिला यशस्वी राष्ट्रीय खेळाडू म्हणून उदयास आला. यामुळेच अर्चरीतील शिवछत्रपती पुरस्काराचा तो मानकरी ठरला आहे.
आजही शेतीच्या बांध्यावर स्वप्नीलची आर्चरीचा साधना सुरू आहे. शिवछत्रपती पुरस्काराने त्यांच्या अंगी नवे बळ संचारले आहे. आता आशियाई स्पर्धेत तिरंगा फडकविण्याचे वेध त्याला लागले आहेत. महाराष्ट्राचा क्रीडा आयकॉन ठरलेला स्वप्नील आता देशासाठी खेळण्याकरीता आतुर आहे. अजून आधुनिक सुविधा त्याला लाभल्या तर आशियाई स्पर्धेतील तो पहिला मराठी धर्नूधर ठरो हीच शुभेच्छा.