शनिवारी (21 जुलै) जर्मनीतील बार्लिनमध्ये पार पडलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाला रौप्यदकावर समाधान मानावे लागले आहे. तर भारताच्या मिश्र संघाला कांस्यपदक मिळाले
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय महिला संघाला फ्रन्सविरुद्ध 228-229 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
भारतीय महिला संघात त्रिशा देब, ज्योती सुरेखा आणि मुस्कान किरार यांचा समावेश होता. या तिघींनी फ्रान्सविरुद्ध सामन्याच्या पहिल्या फेरीत 59-57 अशी आघाडी घेत चांगली सुरुवात केली होती.
मात्र त्यानंतर सोफी डोडेमोंट, अमेली सेनकेनॉट आणि सांड्रा हरेव्ह यांचा समावेश असणाऱ्या फ्रान्स महिला संघाने चांगली लढत देत दुसऱ्या फेरीत सामना 113 गुणांवर बरोबरीचा केला.
तर तिसऱ्या फेरीत फ्रन्सने 174-169 अशी आघाडी घेतली. त्यामुळे पिछाडीवर पडलेल्या भारतीय महिलांनी चौथ्या फेरीत जबरदस्त कामगिरी करताना 60 पैकी 59 गुण मिळवले. परंतू तिसऱ्या फेरीत 5 गुणांच्या पिछाडीमुळे पूर्ण सामन्यात भारताला सुवर्णपदकासाठी 1 गुण कमी पडला.
Indian Compound Women #Archery Team (Tisha Deb, Muskan Kirar and Jyothi Surekha settled for 🥈 medal
France beat India in finals 229-228 #WCBerlin pic.twitter.com/XYcnlCTqct
— ARCHERY ASSOCIATION OF INDIA (@india_archery) July 21, 2018
या स्पर्धेत पाचवे मानांकन असणाऱ्या भारतीय महिला संघाने गुरुवारी (19 जुलै) उपांत्य सामन्यात तुर्की संघाला 231-228 असे पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारली होती.
तर स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारतीय महिलांनी ब्रिटनला तर दुसऱ्या फेरीत अमेरिकेला पराभवाचा धक्का दिला होता.
तसेच या स्पर्धेत भारताच्या मिश्र संघानेही कांस्य पदकाची कमाई केली आहे. अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा हे भारताच्या मिश्र संघात खेळले आहेत. त्यांनी कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात तुर्कीचा 156-153 अशा फरकाने पराभव केला.
#Archery World Cup Stage-4 at #WCBerlin
Compound Mixed duo @archer_abhishek & Jyothi Surekha Vennam beat Turkey (🇮🇳156-153🇹🇷) & grabbed BRONZE 🥉Medal@abpnewstv @DDNewsLive @TOISportsNews @theipaper @ZeeNewsSports @aajtak pic.twitter.com/rQuQxv84LN
— ARCHERY ASSOCIATION OF INDIA (@india_archery) July 21, 2018
या विश्वचषकात मिळालेल्या यशाबद्दल भारतीय तिरंदाजी संघटनेने शुभेच्छा दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–टॉप 5: पाकिस्तान-झिम्बाब्वे यांच्यातील चौथ्या सामन्यात झाले हे खास विक्रम
–विराट कोहली, शिखर धवन कुटुंबासमवेत घेत आहेत सहलीचा आनंद
–कुलदीपच्या कसोटी संघातील समावेशाने मुंबईकर माजी फलंदाज नारज