पुणे,दि.5 नोव्हेंबर 2023: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या तेराव्या ओम दळवी मेमोरियल डॉ.नितु मांडके करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत अर्चित डहाळे, आरव ईश्वर, अयान शेट्टी, अर्चित धुत या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औध येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत बिगर मानांकित अर्चित डहाळेने तिसऱ्या मानांकित आरव ईश्वरचा 6-1, 6-3 असा तर, तामिळनाडूच्या प्रणव एसआर याने चौथ्या मानांकित महाराष्ट्राच्या अभिराम निलाखेचा 6-2, 6-4 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली.
महाराष्ट्राच्या अयान शेट्टीने सातव्या मानांकित आपला राज्य सहकारी दिव्यांक कवितकेचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. महाराष्ट्राच्या अर्चित धुतने कर्सुनाटकच्या आठव्या मानांकित सूहास सोमाचा 7-5, 6-1 असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली. (Archit Dahale, Aarav Ishwar, Ayan Shetty, Archit Dhut enter the main round of Under-18 Super Series)
निकाल: अंतिम पात्रता फेरी: मुले:
सात्विक कोलेपल्ली (महा)(1)वि.वि.नीरज जोर्वेकर (महा)6-1, 6-2;
सार्थ बनसोडे(महा)(2)वि.वि.समीहन देशमुख(महा)6-1, 6-2;
अर्चित डहाळे(महा) वि.वि.आरव ईश्वर(महा)(3)6-1, 6-3;
प्रणव एसआर (तामिळनाडू) वि.वि.अभिराम निलाखे (महा)(4)6-2, 6-4;
सर्वेश झवर (महा)(5)वि.वि.स्वर्णिम येवलेकर(महा)6-2, 6-3;
अयान शेट्टी(महा) वि. वि.दिव्यांक कवितके(महा)(7)6-3, 6-2;
अर्चित धुत (महा) वि.वि.सुहास सोमा(कर्नाटक)(8)7-5, 6-1.
खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणेः
मुले: 1.पार्थ देवरूखकर (महा), 2.सात्विक कोलेपल्ली(महा), 3.जय पवार(महा), 4.अनमोल नागपुरे (महा), 5.फतेहब सिंग (महा), 6.ओंकार शिंदे (महा), 7. सार्थ बनसोडे(महा), 8.पार्थ सोमाणी(महा);
मुली: 1.हिरवा रंगणी(गुजरात), 2.अभिलिप्सा मल्लिक(महा), 3.धनवी काळे (महा), 4.श्रुती नानजकर(महा), 5.अपेक्षा कांदाडी(तेलंगणा), 6.पार्थसारथी मुंढे(महा), 7.आर्या बोरकर(महा), 8. आनंदी भुतडा(महा).
महत्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिकेला धूळ चारल्यावर रोहितचे पुढचे प्लॅनिंग! म्हणाला, “आता फक्त दोन मॅच…”
‘हमारी भाभी कैसी हो’, चाहत्यांनी सूर लावताच विराटने गिलपुढे दिली ‘अशी’ रिॲक्शन; व्हिडिओ पाहिला का?