पाकिस्तान संघ आशिया चषक 2023मध्ये विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. मालिकेतील 11 आणि सुपर फोर फेरीतील पाचवा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. बलाढ्य पाकिस्तान संघ या सामन्यात पराभूत झाल्यामुळे त्यांना अंतिम सामन्यात स्थान मिळाले नाही. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या संघातील अतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहेत.
पाकिस्तानमधील एका माध्यामाने याविषयी माहिती दिली आहे. बोल न्यूजच्या माहितीनुसार श्रीलंकेविरुद्धचा सामना संपल्यानंतर पाकिस्तान संघाच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण तापले होते. कर्णधार बाबर आझम () संघातील सहकारी खेळाडूंना पराभवासाठी कारणीभूत ठरवत होता. पण तितक्यात त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने कर्णधाराला प्रत्युत्तर दिले. यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. माहितीनुसार यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान याने मध्ये येऊन वाद शांत केला.
श्रीलंकेविरुद्धचा हा क्वॉलिफायर सामना पाकिस्तानने गुरुवारी (14 सप्टेंबर) खेळला. या सामन्यात श्रीलंकेला जिंकण्यासाठी 42 षटकांमध्ये 252 धावा हव्या होत्या. श्रीलंकन संघानेही डावातील शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला आणि पाकिस्तला आशिया चषकातून बाहेर केले. या रोमांचक सामन्यात मिळालेला पराभव पाकिस्तानसाठी निराशाजनक होता. परिणामी कर्णधार बाबर आझम याने ड्रेसिंग रुममध्ये सहकारी खेळाडूंवर राग काढल्याचे सांगितले जात आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार बाबर आझम म्हणाला, “तुम्ही (संघातील इतर खेळाडू) जबाबदारीने खेळत नाहीत.”
Pakistan heated dressing room argument (Bolnews):
– Babar told players they’re not playing responsibly.
– Shaheen said ‘at least appreciate who bowled and batted well’.
– Babar didn’t like interruption and said ‘I know who’s performing well’.
– Rizwan came to stop argument. pic.twitter.com/CMsoHloQH8
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 16, 2023
पाकिस्तानसाठी या सामन्यात शाहीन शाह आफ्रिदी आणि इफ्तिखार अहमद यांनी अनुक्रमे 2 आणि 3 अशा विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, या गोलंदाजांना देखील बाबरचे बोलने ऐकावे लागला. अशातच शाहीनचा संयम तुटला आणि तो म्हणाला, “किमान यांनी चांगली गोलंदाजी केली, त्यांचे तरी कौतुक कर.” यावर बाबने प्रत्युत्तर दिले, “होय, मला माहीत आहे की, कोण चांगला खेळला.” दोघांमधील ही शाब्दिक चकमक वाढण्याआधीच मोहम्मद रिझवान याने वातावर शांत करण्याचे काम याठिकाणी केले. पाकिस्तानमधील काही माध्यमांमध्ये याविषयी सविस्तर माहिती दिली गेली आहे. दरम्यान, पाकिस्तानला या सामन्यात पराभूत केल्यानंतर श्रीलंका संघ अंतिम सामन्यात पोहोचला. रविवारी (16 सप्टेंबर) आशिया चषकाचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
आशिया कप 2023 मध्ये बोलली गिलची बॅट! श्रीलंकन फलंदाजांनी दाखवले सातत्य
भन्नाट, जबरदस्त! 2023 मध्ये ‘असा’ विक्रम फक्त टीम इंडियाचा ‘प्रिन्स’ गिललाच जमला, नजर टाकाच