टोकियो ऑलिंपिक्स २०२० मधील सातव्या (२९ जुलै) दिवसाला सुरुवात झाली आहे. पुरुषांच्या नौकानयन लाईटवेट डबल स्कल्सच्या अंतिम बी स्पर्धेतील भारतासाठी पहिला निकालही समोर आला आहे. अर्जुन लाट जाट आणि अरविंद सिंगच्या भारतीय जोडीने फायनल बीमध्ये चांगली कामगिरी केली.
या भारतीय जोडीने ही स्पर्धा ६:२९:६६ या वेळेत पूर्ण केली आणि त्यांनी अंतिम बी स्पर्धेच्या रँकिंगमध्ये पाचवे स्थान पटकावले. याव्यतिरिक्त त्यांनी पुरुषांच्या लाईटवेट डबल स्कल्समध्ये एकूण ११ वे स्थान मिळवले. (Arjun Lal & Arvind Singh finish 5th (5 teams) in Final B clocking 6:29.66; finishing 11th overall)
#Rowing : Lightweight Double sculls:
Arjun Lal & Arvind Singh finish 5th (5 teams) in Final B clocking 6:29.66; finishing 11th overall.
This is India's best ever showing in Rowing.
Earlier Best: Dattu Bhokanal finished 13th at Rio 2016. #Tokyo2020withIndia_AllSports pic.twitter.com/dDdvtSL1rh— India_AllSports (@India_AllSports) July 29, 2021
नौकानयनातील हे भारताचे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे. यापूर्वी दत्तू भोकनळ यांनी रिओ ऑलिंपिक २०१६ मध्ये १३ वे स्थान पटकावले होते.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना
-जर्मन महिला जिम्नॅस्टच्या कपड्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; पण का?