मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने 19 वर्षांखालील भारतीय संघाकडून नुकतेच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. तो श्रीलंका दौऱ्यात दोन चारदिवसीय सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळला.
परंतू त्याची या दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी संघात निवड झालेली नसल्याने सध्या तो इंग्लंडमध्ये आहे. याबद्दल त्याने इंस्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमुळे समजले आहे. हे अकाऊंट अर्जूनचे अधिकृत आहे की नाही याबद्दल काही माहिती नाही.
त्याने इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनिएल वॅटबरोबरचा नंदोस या रेस्टोरंटमधील फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यात ते दोघे जेवण करताना दिसत आहेत.
Arjun Tendulkar out for lunch with English star Danielle Wyatt, who had once proposed to Virat Kohli 😂#India #England #Under19 pic.twitter.com/bRNsdiBt2R
— Read Scoops (@ReadScoops) August 7, 2018
याबरोबरच या दोघांचे अन्य फोटोही सध्या सोशल मिडियावर वायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/BmJIe7Vn2rv/?tagged=daniellewyatt
याबरोबरच ज्यावेळी अर्जुनची 19 वर्षांखीलील भारतीय संघात निवड झाली होती त्यावेळी आयसीसीने केलेल्या ट्विटवर वॅटनेही कमेंट केली होती.
अर्जुनची श्रीलंकेविरुद्ध झालेल्या चार दिवसीय कसोटी मालिकेत विशेष अशी कामगिरी झाली नव्हती. त्याला या मालिकेत त्याला 14 धावा आणि 3 विकेट्स घेता आल्या.
तसेच वॅटही सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या किया सुपर लीगमध्ये व्यस्त आहे. ती या लीगमध्ये साउदर्न व्हीपर्स संघाकडून खेळते.
याबरोबरच वॅट ही भारताचा कर्णधार विराट कोहलीची फॅन असुन तिने एकदा त्याला ट्विटरवर लग्नाची मागणी देखील घातली होती. त्यामुळे ती भारतीय चाहत्यांच्याही चांगलीच ओळखीची आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–जय-विरु जोडीतील सचिन तेंडूलकरसाठी सेहवाग नाही तर हा खेळाडू आहे विरु
–विश्वचषकात अपयश येऊ नये म्हणुन स्टेनकडे आहेत या योजना
–रोहित शर्मा म्हणतो, कुलदीप तू इंग्लंडमध्ये फक्त फोटोच काढ!