---Advertisement---

अर्जून तेंडूलकरची भारतीय संघात निवड, १९ वर्षाखालील टीम इंडियासोबत करणार श्रीलंका दौरा

On: गुरूवार, जून 7, 2018 6:47 PM
---Advertisement---

अर्जून तेंडूलकरची १९ वर्षाखालील भारतीय संघात श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली आहे. टीम इंडिया या दौऱ्यात दोन चार दिवसीय तर ५ वनडे सामने खेळणार आहे. हा दौरा जुलै महिन्यात सुरु होईल.

चार दिवसीय सामन्यात अनुज रावत या संघाचे नेतृत्व करणार आहे. अनुजने गेल्याच हंगामात दिल्लीकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

वनडे सामन्यात संघाचे नेतृत्व अर्यन जुवालकडे देण्यात आले आहे. त्याने उत्तर प्रदेशकडून गेल्याच हंगामात अ दर्जाच्या सामन्यांत विजय हजारे ट्राॅफीमध्ये पदार्पण केले आहे.

१८ वर्षीय अर्जून हा धरमशाला येथे झालेल्या २५ खेळाडूंच्या सराव शिबीरात सहभागी झाला होता. ६ फूटांपेक्षा जास्त उंची असलेला अर्जून मिचेल स्टार्क आणि बेन स्टोक्सला आपले रोल माॅडेल मानतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment