सुरत।19 वर्षांखालील विनू मांकड स्पर्धेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन चमकदार कामगिरी करत आहे. त्याने रविवारी बंगाल विरुद्धच्या सामन्यात 3 विकेट घेत मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.
या सामन्यात बंगालने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण मुंबईच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करताना बंगालला 32 षटकात सर्वबाद 114 धावांवरच रोखले.
अर्जूनने बंगालच्या या डावात 28 धावा देत 3 विकेट घेतल्या. त्याने बंगालच्या शेवटच्या तीनही विकेट घेत बंगलला कमी धावात रोखण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याने बंगालच्या कौशिक मैती, आरका सरकार आणि एसके अझरुद्दीन यांना बाद केले.
यातील मैतीने 17 धावा केल्या होत्या, तर सरकार आणि अझरुद्दीनला भोपळाही फोडता आला नाही.
मुंबईकडून अर्जूनबरोबरच अथर्व अंकोलेकर आणि आकाश शर्माने ही अनुक्रमे 32 आणि 23 धावा देत प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.
बंगालने मुंबईसमोर विजयासाठी ठेवलेले 115 धावांचे आव्हान मुंबईने 30.3 षटकात यशस्वी पूर्ण केले. मुंबईकडून दिव्यांशने नाबाद 56 धावांची अर्धशतकी खेळी करत मुंबईला 7 विकेट्सने विजय मिळवून दिला.
गुजरात विरुद्धच्या सामन्यातही चमकला अर्जुन तेंडुलकर-
अर्जूनने शनिवारी(6 आॅक्टोबर) गुजरात विरुद्धच्या सामन्यातही 5 विकेट्स घेण्याची कामगिरी बजावली होती. गुजरात विरुद्धच्या या सामन्यात अर्जूनने 8.2 षटके गोलंदाजी करताना 30 धावांत 5 विकेट्स घेतल्या. त्याने गुजरात संघाला सुरुवातीलाच मोठे धक्के दिले होते. अर्जूनने गुजरातचे पहिले तीन फलंदाज आणि शेवटचे दोन फलंदाजांना बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
–पृथ्वी शॉ पाठोपाठ हा युवा खेळाडूही ठोठावतोय टीम इंडियाचे दार
–…तरच भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत वन-डेत येणार अव्वल स्थानी
–PBL 2018: प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये भारतीय खेळाडू मालामाल