---Advertisement---

दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेत बदोनीवर मोठी जबाबदारी! तर काही आश्चर्यकारक खेळाडूंना संधी

On: सोमवार, ऑगस्ट 3, 2026 6:52 PM
---Advertisement---

दुलीप ट्रॉफी 2026 (Dulip Trophy 2026) स्पर्धेसाठी सेंट्रल, वेस्ट, ईस्ट आणि साऊथ या संघांनंतर आता नॉर्थ झोननेही आपल्या संघाची घोषणा केली आहे. यामध्ये, निवडकर्त्यांनी काही थक्क करणारे निर्णय घेतले असून कन्हैया वधावनकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर आयुष बडोनीला (Ayush badoni) संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

याशिवाय, नॉर्थ झोनच्या संघात अब्दुल समद, अंशुल कंबोज आणि अर्शदीप सिंग यांसारख्या स्टार खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, इतर संघांच्या तुलनेत या संघात जास्त उणिवा दिसून येत आहेत.

नॉर्थ झोन संघाची धुरा जम्मू आणि काश्मीरचा यष्टीरक्षक-फलंदाज कन्हैया वधावनच्या हाती देण्यात आली आहे. याशिवाय, पंजाबचा स्टार फलंदाज उदय सहारन याला उत्तम कामगिरी करूनही संघात स्थान मिळालेले नाही तर, अर्शदीप सिंगला आता संघात कसोटी प्रकारातही (Test Format) संधी द्यायची आहे, त्यामुळेच त्याला नॉर्थ झोनच्या संघातही स्थान मिळाले आहे. तसेच वेगवान गोलंदाजी मजबूत करण्यासाठी अंशुल कंबोजलाही (Anshul kamboj) स्थान दिले आहे. यासोबतच जम्मू आणि काश्मीरच्या युद्धवीर सिंगलाही संधी मिळाली आहे.

तसेच, फलंदाजीत अब्दुल समद, यश धूल आणि कामरान इकबाल देखील दिसत आहेत. मात्र, सर्वात मोठी जबाबदारी आता उपकर्णधार आयुष बडोनीवर असणार आहे. त्याला फलंदाजीत योगदान द्यावे लागेल. फिरकी अष्टपैलू (Spin all-rounder) म्हणून निशांत सिंधुलाही या संघात स्थान देण्यात आले आहे.

दुलीप ट्रॉफी 2026 साठी नॉर्थ झोनचा संघ:
कन्हैया वधावन (कर्णधार), आयुष बडोनी (उप-कर्णधार), सनत सांगवान, कामरान इकबाल, यश धूल, आयुष दोसेजा, अब्दुल समद, निशांत सिंधु, अर्जुन शर्मा, आबिद मुश्ताक, अर्शदीप सिंह, सुनील कुमार, अंशुल कंबोज, युद्धवीर सिंह, निखिल कश्यप.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---