इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना संपल्यानंतर भारतीय संघाला इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची टी-२० आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. १४ जुलै रोजी भारताचा इंग्लंड दौरा संपणार असून त्यानंतर २२ जुलैपासून भारतीय संघाला वेस्ट इंडीविरुद्धची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी बुधवारी (६ जुलै) संघ घोषित केला. अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांना या मालिकेतून एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळू शकते.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत शिखर धवन (Shikhar Dhawan) भारताचा कर्णधार असेल. मागच्या मोठ्या काळापासून धवन संघातून बाहेर होता आणि या मालिकेत त्याच्या जोरदार पुनरागमनाची शक्यता आहे. तसेच शुबमन गिल आणि संजू सॅमसन यांना अनुक्रमे दोन आणि एका वर्षानंतर एकदिवसीय संघात सहभागी केले गेले आहे.
तसेच या मालिकेतून आवेश खान (Avesh Khan) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) या दोन युवा गोलंदाजांना एकदिवसीय पदार्पण करण्याची संधी मिळेल, अशी दाट शक्यता आहे.
आवेश खानने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात टी-२० पदार्पण केले होते, जेव्हा वेस्ट इंडीज संघ भारत दौऱ्यावर आला होता. आता याच संघाविरुद्ध आवेशला एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळू शकते. तर दुसरीकडे अर्शदीपने अद्याप भारतीय संघासाठी एकही सामना खेळला नाहीये. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील टी-२० मालिकेसाठी अर्शदीपला संघात निवडले गेले होते, परंतु त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली नाही. आता भारतीय संघाचे व्यवस्थापन त्याला वेस्टइंडीजविरुद्ध पदार्पणाची संधी देऊ शकते.
#TeamIndia ODI squad:
Shikhar Dhawan (C), Ravindra Jadeja (VC), Ruturaj Gaikwad, Shubman Gill, Deepak Hooda, Suryakumar Yadav, Shreyas Iyer, Ishan Kishan (WK), Sanju Samson (WK), Shardul Thakur, Yuzvendra Chahal, Axar Patel, Avesh Khan, Prasidh Krishna, Mohd Siraj, Arshdeep Singh— BCCI (@BCCI) July 6, 2022
आवेशने भारतासाठी आतापर्यंत ८ टी-२० सामने खेळले असून यामध्ये ७ विकेट्स घेतल्या आहेत. या सामन्यांमध्ये त्याने १५० चेंडू टाकले आणि ७.६८ च्या इकोनॉमीने १९२ धावा खर्च केल्या. यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आवेश खानसाठी वेस्ट इंडीजविरुद्धची ही मालिका महत्वाची ठरू शकते. अर्शदीप सिंगने आयपीएल २०२२ मध्ये पंजाब किंग्जसाठी जबरदस्त गोलंदाजी केली. अर्शदीपला विकेट्स तर जास्त मिळाल्या नाहीत, पण शेवटच्या षटकांमध्ये त्याने संघासाठी किफायतशीर गोलंदाजी करून दाखवली होती. वेस्ट इंडीजिवरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही तो संघासाठी महत्वाचा गोलंदाज बनू शकतो.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताने केलेल्या ‘त्या’ चुकीचा पाकिस्तानला फायदा, WTC गुणतालिकेत केले ओव्हरटेक
भारतीय संघात रोहितचे पुनरागमन झाल्यास कोण होईल बाहेर? इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेआधी प्रश्नचिन्ह
भारताविरुद्ध इंग्लंडने वापरलेलं ‘बझबॉल’ म्हणजे नक्की काय रे भावड्या? जाणून घ्या एका क्लिकवर