---Advertisement---

0,0,0,0,0,0….भारताच्या पराभवासमोर अर्शदीप सिंगची ऐतिहासिक कामगिरी विसरू नका! ‘असे’ करणारा केवळ दुसराच भारतीय

On: बुधवार, जुलै 8, 2026 2:05 PM
---Advertisement---

भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. आयर्लंडमधील निराशाजनक कामगिरी मागे टाकत इंग्लंडमध्ये चांगली सुरूवात करण्याचा भारताच्या टी २० संघाचा प्रयत्न फसला. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका खेळली जात आहे. यातील तिसरा सामना मंगळवारी (७ जुलै) नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिजवर खेळला गेला. हा सामना भारताने गमावला, मात्र त्यामध्ये वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने इतिहास रचला.

या सामन्यात भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अर्शदीपने आपल्या स्विंग आणि अचूक गोलंदाजीने निर्धाव षटकाने डावाची सुरूवात केली. इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्ट हा अर्शदीपच्या आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या स्विंग चेंडूपुढे पूर्णपणे हतबल दिसला. सॉल्ट त्या सहा चेंडूंमध्ये एकही धाव काढू शकला नाही.

अर्शदीपने या षटकामुळे आपल्या टी २० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला. त्याने आपल्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा डावाचे पहिले षटक निर्धाव टाकले. तसेच तो भारतासाठी टी २० क्रिकेटमध्ये एकापेक्षा अधिक वेळा निर्धाव पहिले षटक टाकणारा केवळ दुसराच भारतीय गोलंदाज ठरला.

टी २० क्रिकेटमध्ये भारताच्या पहिल्या निर्धाव षटकाच्या यादीत दिग्गज स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार पहिल्या स्थानावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत सहा वेळा ही कामगिरी केली आहे. आता अर्शदीपने दुसऱ्यांदा ही कामगिरी करत दुसरे स्थान गाठले आहे.

भारतासाठी टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक निर्धाव पहिले षटक टाकणारे
भुवनेश्वर कुमार – ६ वेळा
अर्शदीप सिंग – २ वेळा
हरभजन सिंग – एक वेळा
हार्दिक पंड्या – एक वेळा
अक्षर पटेल – एक वेळा
दीपक चहर – एक वेळा
मोहम्मद सिराज – एक वेळा
आशिष नेहरा – एक वेळा
प्रवीण कुमार – एक वेळा
बरिंदर स्रान – एक वेळा

भारताला मागील पाच टी २० सामन्यांपासून विजयाची प्रतीक्षा आहे, मात्र अर्शदीप सलग दुसऱ्या सामन्यात भारताला अप्रतिम सुरूवात करून देत आहे. त्याने दुसऱ्या सामन्यातही पहिल्या षटकात केवळ एक धाव दिली होती आणि इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीराना बाद केले होते. हा सामनाही भारताने गमावला होता.

आता अर्शदीपने तिसऱ्या सामन्यात ४ षटकांत ३६ धावा देत एक विकेट घेतली. प्रिन्स यादवने ४ षटकांत ३० धावा देत २ विकेट्स घेतल्या, मात्र बाकी भारतीय गोलंदाजांनी अधिक धावा खर्च केल्याने इंग्लंडने २० षटकांत ७ विकेट्स गमावत २०१ धावसंख्येचा डोंगर उभारला. यामध्ये सॉल्टने सर्वाधिक ७० धावा केल्या.

प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांनी पुन्हा निराशा केली. पाहुण्या संघाने ११.४ षटकांत सर्व विकेट्स गमावत केवळ ७६ धावा केल्या. यामुळे पाच सामन्यांच्या या टी २० मालिकेत भारत ०-२ असा मागे आहे. चौथा सामना ९ जुलैला ब्रिस्टल येथे खेळला जाणार आहे. (Arshdeep Singh historic first over maiden record in eng vs ind third t20)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---