---Advertisement---

‘रेकॉर्ड्स चांगले असूनही अर्शदीपच्या आधी आवेशला का मिळाली संधी?’, चाहत्यांनी विचारले प्रश्न

On: सोमवार, जुलै 25, 2022 1:47 PM
Arshadeep-Football
---Advertisement---

भारतीय संघाने वेस्ट इंडीज दौऱ्यातील दुसरा एकदिवसीय सामना जिंकला आणि तीन सामन्यांच्या या मालिकेत ०-२ अशी विजयी आघाडी घेतली. उभय संघातील हा दुसरा सामना रविवारी (२४ जुलै) त्रिनिदादमध्ये खेळला गेला, जो भारताने २ विकेट्स शिल्लक ठेवून जिंकला. युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला या सामन्यातून एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण तसे काही झाले नाही. अर्शदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नसल्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. 

वेस्ट इंडीजविरुद्धच्या या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रसिद्ध कृष्णाच्या जागी आवेश खानला संघात सामील केले गेले. आवेश खान एकदिवसीय पदार्पणाच्या या सामन्यात संघासाठी महागात पडला. त्याने टाकलेल्या ६ षटकांमध्ये तब्बल ५४ धावा खर्च केल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. आवेश खान टी-२० क्रिकेटमध्ये जरी चांगली कामगिरी करत असला, तर या सामन्यात मात्र तो अपयशी ठरल्याचेच दिसले. भारताला या सामन्यात विजयासाठी ३१२ धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे संघाने ८ विकेट्सच्या नुकसानावर आणि ४९.४ षटकात गाठले.

आवेश खानला संघ व्यवस्थापनाने एकदिवसीय पदार्पणाची संधी दिली, पण अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) मात्र अजूनही पदार्पणासाठी वाट पाहत आहे. चाहते देखील याच कारणास्तव नाराज आहे. सोशल मीडियावर चाहत्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे.

https://twitter.com/CricketFreakD/status/1551191125117239296?s=20&t=MmIVDBbGVIe6vtHfzly9Nw

अर्शदीपने आयपीएल २०२२ हंगामात पंजाब किंग्जसाठी किफायशीर गोलंदाजी केली होती आणि याच कारणास्तव त्याला भारताच्या टी-२० संघासाठी पदार्पणाची संधी मिळाली. अर्शदीपने आयपीएलमध्ये इतरांच्या तुलनेत विकेट्स जास्त घेतल्या नाहीत, पण शेवटच्या षटकांमध्ये तो धावांवर लगाम लावू शकला होता. पंजाब किंग्जला त्याच्या या गुणवत्तेचा चांगला फायदा झाल्याचे पाहिले गेले होते.

नुकत्याच पार पडलेल्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यात अर्शदीप देखील संघासोबत गेला होता. साउथँम्पटनमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात अर्धशदीपने भारतासाठी टी-२० पदार्पण केले. त्याने या सामन्यात टाकलेल्या ३.३ षटकांमध्ये १८ धावा खर्च केल्या होत्या. संघासाठी किफायशीर गोलंदाजी करून देखील त्या सामन्यानंतर अर्शदीपला अद्याप दुसरा एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाहीये.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

WIvsIND: तोच सिराज, तेच शेवटचे षटक! संजूची दिसली ‘तिच’ झलक, व्हिडिओ व्हायरल

आवेशचं भविष्य धोक्यात! वनडे पदार्पणातच ठरला असता संघाच्या पराभवाचं कारण

चेंडू मारायचा एकीकडे होता, पण गेला दुसरीकडे; पाहा शुबमन गिलने विचित्र पद्धतीने गमावलेली विकेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---