---Advertisement---

तेजतर्रार अर्शदीप पहिल्याच वर्षी आयसीसी पुरस्कारासाठी नामांकित; हे खेळाडू देणार टक्कर

---Advertisement---

सध्या 2022 वर्षातील अखेरचे काही दिवस शिल्लक आहेत. क्रिकेटजगतात या संपूर्ण वर्षभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. तीन विश्वचषक या वर्षभरात खेळले‌ गेले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ‌(आयसीसी) दरवर्षीप्रमाणे यावेळीही आपल्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करणार आहे. त्यासाठी त्यांनी नामांकने जाहीर करण्यास सुरुवात केली. आयसीसीने यावेळी प्रथम चालू वर्षात चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना देण्यात येणाऱ्या उदयोन्मुख खेळाडूच्या पुरस्कारासाठीची नामांकने जाहीर केली आहेत.

 

या वर्षभरात काही युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली विशेष छाप पाडली. त्यापैकीच चार खेळाडूंना आता आयसीसीने आपल्या 2022 वर्षातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू पुरस्कारासाठी नामांकित केले. या खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा युवा अष्टपैलू मार्को जेन्सन, भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, अफगाणिस्तानचा इब्राहिम झादरान व न्यूझीलंडच्या फिन ऍलन यांचा समावेश आहे.

भारतीय संघासाठी पदार्पण करणाऱ्या अर्शदीप सिंग याने अल्पावधीतच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आयपीएल व देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करून तो भारतीय संघात दाखल झालेला. अवघ्या दोन महिन्यात त्याने आपली योग्यता सिद्ध करत भारताच्या टी20 विश्वचषक संघात जागा बनवली. तो या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून देखील समोर आला. त्यामुळे या पुरस्काराचा मोठा दावेदार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.

दक्षिण आफ्रिकेचा युवा अष्टपैलू मार्को जेन्सन याने मागील वर्षी बॉक्सिंग डे कसोटीत भारताविरुद्ध पदार्पण केलेले. तेव्हापासून तो सातत्याने दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघात जागा बनवून वेगवान गोलंदाजी सोबतच फलंदाजीही तो‌ उपयुक्त योगदान देताना दिसतो. रबाडा‌ व‌ नॉर्किए यांच्यासह त्याने दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाला धार दिली आहे.

न्यूझीलंडचा युवा सलामीवीर फिन ऍलन हा या वर्षातील चर्चित नावांपैकी एक होता. त्याने टी20 व वनडेमध्ये प्रत्येकी एक शतक झळकावलेले. टी20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने केलेल्या आक्रमक खेळीमुळे त्याला ओळख मिळाली होती. या तिघांसोबतच यावर्षी अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक धावा काढणारा युवा फलंदाज इब्राहिम झादरानही या पुरस्कारासाठी उमेदवार असेल.

‌(Arshdeep Singh Nominated For ICC Emerging Player 2022 Along With Jansen, Allen And Zadran)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी! बांगलादेशच्या हेड कोचने दिला राजीनामा
भारताचे कसोटी स्टार आयसीसी क्रमवारीत चमकले, अय्यरने घेतली 10 स्थानांची झेप

 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---