---Advertisement---

अर्शदीपचा राजस्थानविरुद्ध जलवा! ५ विकेट्स घेण्याबरोबरच कुंबळेशी बरोबरी, ‘हे’ विक्रमही झाले नावावर

Arshdeep-Singh
---Advertisement---

दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ३२ वा सामना मंगळवारी (२१ सप्टेंबर) पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यात राजस्थानने २० षटकात सर्वबाद १८५ धावा करत पंजाबला १८६ धावांचे आव्हान दिले होते. पंजाबकडून युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. याबरोबरच त्याने काही मोठे विक्रम केले आहेत.

अर्शदीपने ४ षटकांत ३२ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्याने एविन लुईस, लियाम लिव्हिंगस्टोन, महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी आणि चेतन साकारिया यांच्या विकेट्स घेतल्या.

अर्शदीप ५ विकेट्स घेणारा तिसरा युवा गोलंदाज
आयपीएलमध्ये आत्तापर्यंत अनेक गोलंदाजांनी ५ किंवा त्यापेक्षा विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. पण, यातील सर्वात कमी वयात आयपीएलमध्ये ५ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अर्शदीपने तिसरे स्थान मिळवले आहे. सोमवारी त्याने जेव्हा ५ विकेट्स घेतल्या, तेव्हा त्याने वय २२ वर्षे २२८ दिवस होते. या यादीत त्याने इशांत शर्माला मागे टाकले. इशांतने आयपीएलमध्ये कोची टस्कर्स केरला विरुद्ध २२ वर्षे २३७ दिवस इतके वय असताना ५ विकेट्स घेतल्या होत्या.

या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा जयदेव उनाडकट आहे. त्याने २०१३ साली २१ वर्षे २०४ दिवस वय असताना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २५ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या पाठोपाठ अल्झारी जोसेफ आहे. त्याने २०१९ साली सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध १२ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. हे आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन देखील आहे.

कुंबळेची बरोबरी
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध ५ विकेट्स घेण्याची कामगिरी करणारा अर्शदीप केवळ दुसराच गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा पराक्रम केवळ अनिल कुंबळेने केला होता. त्याने २००९ साली ५ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या.

पंजाबसाठी ५ विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज
अर्शदीप आयपीएलमध्ये ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा पंजाब किंग्सचा केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्यापूर्वी आयपीएलमध्ये पंजाबकडून दिमित्री मस्करेहान्स आणि अंकित राजपूत यांनी अशी कामगिरी केली आहे. अंकित राजपूतने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध २०१८ साली १४ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, दिमित्री मस्करेहान्सने २०१२ साली पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध २५ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

बदली खेळाडू म्हणून सामील झालेल्या खेळाडूंचे पंजाबकडून आयपीएल पदार्पण, ‘अशी’ आहे टी२० कारकिर्द

इंग्लंडचा ‘टॅटूवाला’ गोलंदाज सोडणार सरेची साथ; ‘या’ संघातून करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन

“पूर्वी फक्त भारत रडारवर होता, आता आणखी दोन संघ असतील”, पीसीबीच्या अध्यक्षांची धमकी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---