क्रिकेट हा सज्जनांचा खेळ म्हणून ओळखला जातो. बऱ्याचदा प्रतिस्पर्धी क्रिकेटपटूही मैदानावर एकमेकांप्रती आदर दाखवताना दिसत असतात, एकमेकांना मदत करण्यासाठी धाव घेताना दिसतात. यालाच क्रिकेटच्या भाषेत खेळाडूवृत्ती असे म्हटले जाते. याच खेळाडूवृत्तीचा प्रत्यय आयपीएल २०२१ मधील ४२ व्या सामन्यात आला आहे. अबु धाबीच्या मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात हा सामना झाला होता.
त्याचे झाले असे की, प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने निर्धारित २० षटकांमध्ये ६ विकेट्स गमावून १३५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल मुंबई संघाने १९ षटकातच ४ विकेट्स गमावत त्यांचे आव्हान पूर्ण केले आणि ६ विकेट्सने सोपा विजय मिळवला.
मुंबईकडून सौरभ तिवारीने सर्वाधिक ४५ धावा चोपल्या. त्याच्या या खेळीदरम्यान पंजाबच्या अर्शदीप सिंगचा एक थ्रो त्याला जोराने लागला. त्यामुळे तो मैदानावर वेदनेने विव्हळताना दिसला.
डावातील १२ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या अर्शदीपच्या तिसऱ्या चेंडूवर तिवारीने साधारण शॉट खेळला. त्याने मारलेला चेंडू अर्शदीपने लगेचच झेलला आणि त्याला बाद करण्यासाठी वेगाने थ्रो केला. परंतु तिवारी धाव घेण्यासाठी पळालाच नसल्याने तो चेंडू जाऊन त्याच्या २ पायांच्या मध्ये लागला. चेंडूच्या जबरदस्त माऱ्यामुळे वेदनाग्रस्त झालेल्या तिवारीने आपल्या हातातील दोन्ही ग्लोव्ह्ज काढले, बॅट खाली फेकली आणि तो मैदानावरच झोपला.
त्याला वेदनेने कळवळताना पाहून पंजाबचा कर्णधार केएल राहुल लगेचच त्याच्याजवळ गेला. त्याने त्याचे दोन्ही पाय पकडत त्याला वेदनेतून मुक्त होण्यासाठी थोडी मदत केली. यावेळी पंजाब संघाच्या इतर खेळाडूंनीही त्याच्याकडे धाव घेत त्याची विचारपूस केली. अगदी ज्या अर्शदीपने त्याला चेंडू मारला होता, त्यानेही त्याची पाहणी केली. या प्रसंगादरम्यान थोड्या वेळासाठी खेळ थांबवण्यात आला होता.
https://twitter.com/pant_fc/status/1442903316447383554?s=20
मात्र पुढे तिवारीने पुन्हा फलंदाजीस जात संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. ३७ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने त्याने ४५ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे मुंबईला पंजाबचे आव्हान पूर्ण करण्यात मदत झाली.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईकरांची मनंच मोठी! चेंडू पायाला लागल्याने राहुल झाला असता धावबाद, पण कृणालने स्वत: पंचांना अडवलं