पुणे: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन 18वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात आर्शीन सप्पल, श्रेया पठारे, श्रावणी देशमुख, सिद्धी खोत यांनी तर, मुलांच्या गटात दिव्यांक कवितके या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.
एमएसएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स, म्हाळुंगे बालेवाडी या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत मुलींच्या गटात दिल्लीच्या आर्शीन सप्पल हिने अव्वल मानांकित श्रीया साई जेएसचा 6-0, 6-1 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. बिगरमानांकीत श्रेया पठारेने सहाव्या मानांकित संचिता नगरकरचा 6-2, 6-2 असा तर, सिद्धी खोत हिने चौथ्या मानांकित अलिना शेखचा 6-4, 6-1 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. क्वालिफायर श्रावणी देशमुख हिने आठव्या मानांकित श्रुती नानजकरचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(5) असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला.
मुलांच्या गटात बिगरमानांकीत दिव्यांक कवितकेने आठव्या मानांकित आर्यन कोटस्थानेवर 6-3, 6-3 असा विजय मिळवला. सिद्धार्थ मराठेने अहान डेचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला. अव्वल मानांकित जय पवारने मिका शेठचा 6-2, 6-1 असा सहज पराभव करून आगेकूच केली. याआधी स्पर्धेचे उदघाटन स्पर्धा संचालक संदीप नूलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा निरीक्षक प्रणव वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: मुली: पहिली फेरी:
आर्शीन सप्पल वि.वि.श्रीया साई जेएस[1] 6-0, 6-1;
देवंशी प्रभुदेसाई वि.वि.आयुशा इंगवले 6-2, 6-0;
ध्रुवा माने वि.वि. आदिती रॉय 6-2, 6-2;
श्रेया पठारे वि.वि.संचिता नगरकर[6]6-2, 6-2;
सिद्धी खोत वि.वि.अलिना शेख[4] 6-4, 6-1;
भक्ती मैंदरकर वि.वि.कौशिकी समंता 6-3, 6-4;
श्रावणी देशमुख वि.वि.श्रुती नानजकर[8] 6-3, 7-6(5);
भक्ती ताजने वि.वि.वैष्णवी सिंग ७-५, ६-२;
सिया प्रसादे[3]वि.वि.आकांक्षा मुतयाला 6-1, 6-1;
धनवी काळे[5] वि.वि.रिषिता अग्रवाल 6-1, 6-2;
अधिरा गुप्ता वि.वि.स्वर्णिमा दुबे 6-3, 6-3;
हिया मेहता वि.वि.सिया नुलकर 6-0, 6-1;
आन्या जेकब[2] वि.वि.नैशा कपूर 6-1, 6-0;
मुले: पहिली फेरी:
जय पवार[1] वि.वि.मिका शेठ 6-2, 6-1;
आर्या देवकर वि.वि.नमित मिश्रा 7-6(4), 6-0;
सार्थ बनसोडे वि.वि.अर्चित धूत 6-4, 6-3;
दिव्यांक कवितके वि.वि.आर्यन कोटस्थाने[8] 6-3, 6-3;
अर्जुन अभ्यंकर[3]वि.वि.राधेय शहाणे 6-0, 6-4;
अर्णव कोकणे वि.वि.बाला सिंग 6-2, 6-1;
सिद्धार्थ मराठे वि.वि.अहान डे 6-0, 6-0;
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंड दौऱ्यासाठी भारत तयार, कर्णधार रोहित, कोहली, बुमराहसह ‘हे’ खेळाडू मुंबईत; कधी पकडणार फ्लाईट?
ज्या दाऊदला पाहून सर्वांची टरकते, त्याला कपिल पाजींनी शिकवलेला चांगलाच धडा, काय होता तो किस्सा?
विराट-केएल राहुलपेक्षा रिषभ पंत सरस, रोहितच्या अनुपस्थित भारतीय संघासाठी प्रथमच केलं ‘हे’ काम