---Advertisement---

जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत सायना-सिंधु आपल्या स्थानी कायम

On: शुक्रवार, जुलै 20, 2018 2:59 PM
---Advertisement---

गुरुवारी (19 जुलै) जागतिक बॅडमिंटन फडरेशनने, आंतराष्ट्रीय महिला आणि पुरुष बॅडमिंटनपटूंची क्रमवारी जाहिर केली.

नुकतेच पार पडलेल्या थायलंड ओपन स्पर्धेत पीव्ही सिंधु अंतिम सामन्यात पराभूत झाली होती. तर सायनाचेही या स्पर्धेतील आव्हान लवकरच संपुष्टात आले होते.

यानंतरही जागतिक एकेरी महिला बॅडमिंटन क्रमवारीत भारतीय स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधु आणि सायना नेहवाल अनुक्रमे 3 ऱ्या आणि 10 व्या स्थानावर कायम आहेत.

तर महिला एकेरी क्रमवारीत अव्वल स्थानी तैवानची ताय झु इंग आहेत.

पुरुष बॅडमिंटन क्रमवारीत भारताचा किदाबीं श्रीकांत पाचव्या तर एचएस प्रणॉय 11 व्या स्थानी आहेत.

पुरुष एकेरी क्रमवारीत अव्वल स्थानी डेन्मार्कचा विक्टोर अॅलेक्सेन अव्वल स्थान पटकावले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-कुलदीप यादव अंतिम 11मध्ये हवाच, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूचे मत

-रशिद खान म्हणतो, कृणाल आपणही हे करायला हवे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment