महान क्रिकेटपटू आणि भारतीय कसोटी संघाचे पहिले कर्णधार कर्नल सी.के. नायडू यांच्या पुतळ्याचे मंगळवारी (२४ जुलै) आंध्र प्रदेशच्या मच्चलीपट्टनम येथे माजी कर्णधार अनिल कुंबळेच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
“मला कर्नल सी.के नायडू यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. कर्नल नायडू महान क्रिकेटपटू होते. त्यांनी भारतातील क्रिकेट विकासाचा पाया रचला आहे.” असे माजी कर्णधार अनिल कुंबळे म्हणाला.
याबरोबर मच्चलीपट्टनम येथे कुंबळेच्या हस्ते मसुला क्रीडा संकुल आणि अॅथलेटीक स्टेडियमच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
“मल आशा आहे की, येत्या काळात भारतासाठी ऑलिंपिक स्पर्धेत पदके जिंकणारे खेळाडू इथे घडतील.” असे कुंबळे या क्रीडा संकुलाचे भूमिपूजन करताना म्हणाला.
कर्नल सी.के नायडू यांची क्रिकेट कारकिर्द-
कर्नल सी.के. नायडू भारतीय कसोटी संघाचे पहिले कर्णधार होते. त्यांनी भारताचे सात सामन्याचे नेतृत्व कले आहे. यामध्ये सी.के. नायडूंनी २५ च्या सरासरीने ३५० धावा केल्या आहेत.
तसेच सी.के. नायडू २०७ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी ३५.९४ च्या सरासरीने ११,८२५ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-भारत-पाकिस्तान पुन्हा आमने सामने, एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर
-रोनाल्डोचा फिटनेस वीस वर्षाच्या तरूण फुटबॉलपटूसारखा