भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेला.
लॉर्ड्स मैदानाचे मुख्य ग्राउंड्समन माइक हंट यांचा हा शेवटचा सामना होता. त्यामुळे लॉर्ड्सवरील सर्व कर्मचाऱ्यांना माइक हंट यांच्या निरोप समारंभाची उत्सुकता लागली होती. मात्र पहिल्या दिवशी पावसाने सर्वांची निराशा केली.
माइक हंट यांनी लॉर्ड्स मैदानाचे मुख्य ग्राउंड्समन म्हणून 1969 साली सुत्रे हाती घेतली होती. लॉर्ड्सवर 49 वर्ष काम केल्यानंतर एमसीसीने त्यांना या सामन्यानंतर पदमुक्त करण्याचा निर्णय घेतला होता.
लॉर्ड्सवर झालेले विश्वचषकाचे अंतिम सामने, अनेक अविस्मरनीय कसोटी सामने आणि एकदिवसीय सामन्यांच्या खेळपट्या स्वत: माइक हंट यांनी तयार केल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-स्म्रीती मानधनाच्या यशात कर्णधार विराट कोहलीचा मोठा वाटा
-ती एक पोस्ट आणि कामरान अकमलवर चाहते पडले तुटून