भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी सर्वच बाबतीत सरस आहे. क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम करणाऱ्या एमएस धोनीने मैदानाबाहेरही मोठा विक्रम केला आहे.
2017-18 च्या अर्थिक वर्षात झारखंड मधून एमएस धोनी सर्वाधिक आयकर भरणारा व्यक्ती ठरला आहे.
एमएस धोनीने 2017-2018 या अर्थिक वर्षासाठी 12.17 कोटी रुपये आयकर भरला आहे. तसेच धोनीने पुढच्या आर्थिक वर्षाचाही 3 कोटी रुपयांचा आयकर आधीच भरला आहे.
याची माहिती झारखंडचे मुख्य आयकर अधिकारी व्ही महालिंगम यांनी दिली.
तसेच धोनीने 2016-17 या आर्थिक वर्षासाठी 10.93 कोटी रुपये आयकर भरला होता. मात्र त्यावेळी धोनी झारखंडमधून सर्वाधिक आयकर भरणारा व्यक्ती नव्हता.
गेल्या एक वर्षापासून आपल्या फलंदाजीच्या फॉर्मशी झगडत असलेल्या एमएस धोनीची मैदानाबोहीरची इनिंग मात्र जोरात चालू आहे.
भारतासाठी क्रिकेट खेळण्याबरोबरच धोनी स्वत:चा व्यवसाय आणि विविध जाहिरातींमधूनही पैसे कमवतो.
महत्वाच्या बातम्या-
-संघाला केले 18 धावांवर आॅलआऊट, 12 मिनीटांतच केला धावांचा पाठलाग
-संजय मांजरेकर, हर्षा भोगलेंना टक्कर द्यायला नवीन समालोचक…–