---Advertisement---

अगदी भारतातील दिग्गजांनीही दिल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला नव्या इनिंगसाठी शुभेच्छा

On: बुधवार, जुलै 11, 2018 4:37 PM
---Advertisement---

पोर्तूगालचा स्टार फु़टबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने इटलीच्या जुवेंटस फुटबॉल क्लबशी चार वर्षांसाठी ८४६ कोटी रुपयांचा करार केला आहे.

याबरोबर रोन्लाडोने रियल मॅद्रिद  बरोबरचा २००९ पासूनचा आपल्या प्रवासाला पूर्णविराम देत आपल्या क्लब फुटबॉल कारकिर्दीची नवी सुरवात केली आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या  जुवेंटस फुटबॉल क्लबच्या निर्णयामुळे रियल मॅद्रिदच्या अनेक चाहत्यांसह त्याचे रियल मॅद्रिदचे संघ सहकरीसुद्धा भावनिक झाले.

या सर्वांनी आपल्या रोनाल्डोविषयीच्या भावना द्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या.

जुवेंटस क्लबशी रोनाल्डोचा करार झाल्यानंतर रियाल मॅद्रिदचा संघ सहकारी सर्जियो रामोसने रोनाल्डोला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

“तुझा प्रत्येक गोल, प्रत्येक सामना आपण रियाल मॅद्रिदसाठी एकत्र जिंकली आहे.  रियाल मॅद्रिदच्या इतिहासात तू स्वत:साठी एक खास स्थान बनवले आहे. तुझ्यासोबत खेळायला मिळाले ही माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. भविष्यासाठी तुला शुभेच्छा.” सर्जियो रामोसने रोनाल्डो विषयी बोलताना त्याच्या भावना या शब्दात व्यक्त केल्या.

यावेळी फु़टबॉल क्षेत्रातील दिग्गजांबरोबर क्रिकेट समालोचक आणि विश्लेषक हर्षा भोगले यांनीही ट्विटर वरुन आपल्या रोनाल्डोविषयीच्या भावना व्यक्त केल्या.

 

तसेच रोनाल्डोच्या ट्रान्सफरवरुन ब्रिटिश पत्रकार पिअर्स मॉर्गन यांनी मॅन्चेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबला ट्रोल केले. कारण अनेक वर्षांपासून मॅन्चेस्टर युनायटेडचा माजी खेळाडू असलेल्या रोनाल्डो पुन्हा मॅन्चेस्टर युनायटेड क्लबमध्ये येणार या आशेवर होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-रोनाल्डोचा रियल मॅद्रिदला अखेर रामराम, फुटबाॅल विश्वात २१ व्या शतकातील सर्वात मोठी ट्रांस्फर

-गुहेतून सुटका झालेल्या १२ मुलांना फिफाने दिले विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्याचे निमंत्रण

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment