बुधवारी (११ जुलै) विंम्बलडन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य पूर्व फेरीत गत विजेता रॉजर फेडररचा पराभव करत दक्षिण आफ्रिकेच्या केविन अॅंडरसनने उपांत्य फेरी गाठली.
या सामन्यात पहिल्या दोन सेटमध्ये विजय मिळवूनही रॉजर फेडररला 2-6 6-7(5) 7-5 6-4 13-1 असा पराभव स्विकारावा लागला.
केविन अॅंडरसनने पहिले दोन सेट गमावूनही उर्वरीत सामन्यात दमदार पुनरागमन करत गत विजेता रॉजर फेडररला पाणी पाजले.
या विजयाबरोबरच 1983 नंतर विंम्बडनची उपांत्या फेरी गाठणारा केव्हीन दक्षिण आफ्रिकेचा पहिला खेळाडू ठरला. यापूर्वी १९८३ साली दक्षिण आफ्रिकेच्या केविन करण यांनी विंम्बलडनची उपांत्य फेरी गाठली होती.
या सामन्यात विंम्बलडनचा बादशहा असलेल्या फेडररला तिसऱ्या सेटमध्ये पराभूत करत केविन अॅंडरसनने फेडररची विंम्बलडनमधील ३४ सेटच्या विजयाची मालिका खंडीत केली.
अॅंडरसन आणि फेडरर यांच्यातील हा पाचवा सामना होता. यामध्ये फेडररला अॅंडरसनकडून प्रथमच पराभूत व्हावे लागले.
आता उपांत्य फेरीच्या सामन्यात केविन अॅंडरसनला अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी अमेरिकेच्या जॉन इसनर विरुद्ध दोन हात करावे लागणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-अगदी भारतातील दिग्गजांनीही दिल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला नव्या इनिंगसाठी शुभेच्छा
-गुहेतून सुटका झालेल्या १२ मुलांना फिफाने दिले विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्याचे निमंत्रण