पाकिस्तानच्या सार्वजनिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इंन्साफ या पक्षाने निर्भेळ यश मिळवले आहे.
असे असले तरी भारताचे माजी सलामीवीर सुनिल गावसकर यांना मात्र इम्रान खान एक दिवस पाकिस्तानचे पंतप्रधान होणार याची आधिच खात्री होती.
तसेच त्यांनी भारत- बांगलादेश यांच्यातील एका एकदिवसीय सामन्याच्या वेळी समालोचन करताना इम्रान खान भविष्यात पाकिस्तानचे पंतप्रधान होतील असे भाकित केले होते.
2012 साली आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या वेळी हा प्रसंग घडला होता. त्यावेळी सुनिल गावसकर यांच्यासोबत पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीझ राजा सहयोगी समालोचक म्हणून उपस्थित होते.
सुनिल गावसकरांनी केलेले हे भाकित आता खरे ठरताना दिसत आहे. गुरुवारी (26जुलै) या निवडणुकीत इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इंन्साफ या पक्षाला मिळालेल्या बहूमतामुळे, 1992 च्या विश्वविजेत्या पाकिस्तान संघाचे कर्णधार इम्रान खान यांचे पंतप्रधान पद नक्की झाले आहे.
Sunil Gavaskar called it on television during commentary "Imran could be the next Prime Minister of Pakistan" pic.twitter.com/Jih0c3GHeD
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) July 26, 2018
पाकिस्तानच्या पाक पॅशन या वृत्तपत्राचे संपादक साज सादिक यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
सध्या सुनिल गावसकरांनी इम्रान खान यांच्या विषयी केलेले भाकित सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-भारतीय फलंदाजांचे भांगडा नृत्य करत चाहत्यांनी केले स्वागत
-विश्वचषकानंतर ‘स्टेन गन’ थंडावणार