पुणे: मंदार वाकणकर टेनिस अकादमी यांच्या तर्फे व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली अरूण वाकणकर मेमोरियल करंडक पुरूष टेनिस 2018 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा डेक्कन जिमखाना क्लब टेनिस कोर्ट येथे दि.29 व 30 सप्टेंबर 2018 या कालावधीत रंगणार आहे.
गेम ऑन ईव्हेंटस्चे सुनिल लुल्ला म्हणाले की, या स्पर्धेला पाठिंबा देताना आम्हांला खुप आनंद झाला आहे. शहरांतील मानांकित खेळाडू या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार असून टेनिसप्रेमी व क्रिडारसिकांना संघर्षपूर्ण व अतितटीचे सामने पाहण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेला गेम ऑन ईव्हेंटस् यांनी पुरस्कृत केले असून ही स्पर्धा पुरूष एकेरी व दुहेरी या दोन गटांत होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहे.