---Advertisement---

आर्या स्पोर्टस टी-20 क्रिकेट स्पर्धेत रॉयल पुरंदर संघाला पराभुत करून शांताराम बापू कटके संघाला विजेतेपद

On: बुधवार, डिसेंबर 27, 2023 7:26 PM
File Photo
---Advertisement---

पुणे,दि.27 डिसेंबर 2023: मा. शरदचंद्रजी पवार आणि मा. अण्णासाहेब पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त खराडी जिमखाना व आर्या स्पोर्टस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आर्या स्पोर्टस टी-20 क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत शुभम तैस्वाल 99 धावा व 2-31) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर शांताराम बापू कटके संघाने रॉयल पुरंदर संघाचा 42 धावांनी पराभव करून विजेतेपद संपादन केले.

खराडी जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत शांताराम बापू कटके संघाने प्रथम फलंदाजी करताना 20षटकात 3बाद 237धावा केल्या. यात शुभम तैस्वालने 45चेंडूत 12चौकार व 5 षटकाराच्या मदतीने 99 धावा चोपल्या. त्याला ऋतुराज वीरकरने 28चेंडूत 3चौकार व 7षटकाराच्या मदतीने 63 धावा काढून साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 45चेंडूत 111 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनतर आदिल अन्सारीने नाबाद 45धावा, रजनीकांत पडवळने नाबाद 14 धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. याच्या उत्तरात रॉयल पुरंदर संघाला 20 षटकात 9बाद 195धावाच करता आल्या. यात वरुण चौधरी नाबाद 52, अभिजीत लोखंडे नाबाद 33, अभिमन्यू जाधव 23 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. शांताराम बापू कटके संघाकडून ओम माळी(4-42), शुभम तैस्वाल(2-31), हॅरी सावंत(2-32) यांनी सुरेख गोलंदाजी केली. सामनावीर शुभम तैस्वाल ठरला.

स्पर्धेतील विजेत्या शांताराम बापू कटके संघाला करंडक व 1लाख रुपये, तर उपविजेत्या रॉयल पुरंदर संघाला करंडक व 61000रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण श्री शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार विजेते श्री अण्णासाहेब पठारे, मा.आमदार बापू साहेब पठारे नगरसेवक महेंद्र पठारे शांताराम बापू कटके (मा. उपसरपंच वाघोली) विलास पठारे पाटील, सोमनाथ भाऊ पठारे, मा. नगरसेवक महादेव पठारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बबन पठारे, संतोष पठारे पाटील निखिल पठारे, सागर पठारे, प्रमोद पठारे, संभाजी पठारे, सोमनाथ आव्हाळे, स्वप्निल भाऊ पठारे, रविन्द्र बापू साहेब पठारे, आणि खराडी जिमखाना चे अध्यक्ष सतीश चंद्रकांत पठारे उपस्थित होते

निकाल: उपांत्य फेरी:
पुणे क्रिकेट क्लब: 20षटकात 5बाद 201धावा(रोहित खरात 53(42,6×4,1×6), सचिन राठोड 37(24,3×4,1×6), ऋषिकेश नायर नाबाद 35(13,2×4,3×6), आतिश कुंभार 23, वरुण चौधरी 2-31, रोशन वाघसरे 1-21) पराभुत वि. रॉयल पुरंदर: 15.1षटकात 1बाद 204धावा(अद्वैय शिधये नाबाद 101(46,17×4,2×6), वैभव चौगुले नाबाद 65(30,6×4,4×6), महेश मस्के 27, अजित कड 1-33); सामनावीर – अद्वैय शिधये; रॉयल पुरंदर संघ 9गडी राखुन विजयी;

सारस हॉटेल: 20षटकात सर्वबाद 194धावा(धीरज फटांगरे 60(34,7×4,2×6), साहिल औताडे 61(32,5×4,4×6), अनिकेत पोरवाल 23, मिझान सय्यद 4-21, हॅरी सावंत 2-28, सौरभ दोडके 1-1) पराभुत वि. शांताराम बापू कटके: 16.4षटकात 4बाद 198धावा (शुभम तैस्वाल 71(33,2×4,7×6), ऋतुराज वीरकर 43(22,2×4,3×6), आदिल अन्सारी नाबाद 29, यशराज खाडे 27, रजनीकांत पडवळ नाबाद 21, निलय नेवसकर 1-17); सामनावीर – शुभम तैस्वाल; शांताराम बापू कटके संघ 6 गडी राखून विजयी;

अंतिम फेरी:
शांताराम बापू कटके: 20षटकात 3बाद 237धावा(शुभम तैस्वाल 99(45,12×4,5×6), ऋतुराज वीरकर 63(28,3×4,7×6), आदिल अन्सारी नाबाद 45(30,2×4,2×6), रजनीकांत पडवळ नाबाद 14, वरुण चौधरी 1-26) वि.वि.रॉयल पुरंदर: 20 षटकात 9बाद 195धावा(वरुण चौधरी नाबाद 52(29,7×4,2×6), अभिजीत लोखंडे नाबाद 33(26,4×4,1×6), अभिमन्यू जाधव 23, ओम माळी 4-42, शुभम तैस्वाल 2-31, हॅरी सावंत 2-32); सामनावीर – शुभम तैस्वाल; शांताराम बापू कटके संघ 42धावांनी विजयी.

इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: वैभव चौगुले (282धावा, रॉयल पुरंदर)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: हॅरी सावंत (10विकेट, शांताराम बापू कटके)
बेस्ट प्लेअर टुर्नामेंट: धीरज फटांगरे (262धावा, सारस हॉटेल);
मालिकावीर: शुभम तैस्वाल (342 धावा व 6विकेट,सारस हॉटेल);
सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक: साहिल औताडे
फेयर प्ले पुरस्कार: अजिंक्य क्रिकेट क्लब.

महत्वाच्या बातम्या – 
IND vs SA: हर्शल गिब्स कर्णधार बावुमावर संतापला; म्हणाला, ‘तो लठ्ठ आणि अनफिट…’
IND vs SA: मास्टर ब्लास्टरही झाला राहुलच्या खेळीचा चाहता; म्हणाला, ‘असे तेव्हा होते जेव्हा तुम्ही…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---