इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलचा पंधरावा हंगाम येत्या मार्च महिन्यात सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव झाला. या लिलावासाठी कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझीचा सह-संघ मालक शाहरुख खान अनुपस्थित होता. अशात त्याची कमतरता भरून काढण्यासाठी त्याची मुले आर्यन खान (Aryan Khan) आणि सुहाना खान (Suhana Khan)यांनी बंगळुरू येथे हजेरी लावली आहे. लिलाव सोहळ्यातील त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आयपीएलच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर लिलाव सोहळ्यापूर्वीचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. यातील एका फोटोमध्ये आर्यन त्याच्या बाजूला बसलेल्या कोलकाता संघाच्या अधिकाऱ्याशी बोलताना दिसला आहे. त्याने लिलाव सोहळ्यास उपस्थिती राहण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी आयपीएल २०२१ च्या लिलावातही तो वडिल शाहरुखसह आला होता. तसेच त्याच्या बाजूलाच त्याची बहिण सुहाना बसली असून ती कान देऊन आपल्या भावाचे बोलणे ऐकत असताना कॅमेरात कैद झाली आहे. तिने लिलाव सोहळ्याला येण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुखची मुले मेगा लिलाव सोहळ्यातील आकर्षण ठरली आहेत.
— IndianPremierLeague (@IPL) February 11, 2022
Prince #AryanKhan is back in #IPLAuction 🔥 pic.twitter.com/twT6EUH5eQ
— SRK Universe (@Srkians_77) February 11, 2022
https://twitter.com/iamn3el/status/1492154847902461953?s=20&t=7CkvqCCD16xXOe4SxfCChw
Looking forward to seeing Aryan Khan and Suhana Khan bidding for players, representing Kolkata Knight Riders 💜@KKRiders @iamsrk #ShahRukhKhan #KKR #IPLAuction pic.twitter.com/fsBrLChMaw
— Arun Katuwal (@arunwrites_) February 11, 2022
याशिवाय प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि कोलकाता संघाची सह-संघ मालकिण जुही चावला हिची मुलगी जान्हवी मेहता (Janhvi Mehta) ही सुद्धा या सोहळ्यास उपस्थित होती. स्वत जुही चावलाने तिच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
So happy to see both the KKR kids, Aryan and Jahnavi at the Auction table .. 🙏😇💜💜💜
@iamsrk @KKRiders pic.twitter.com/Hb2G7ZLqeF— Juhi Chawla Mehta (@iam_juhi) February 18, 2021
दरम्यान कोलकाता संघाच्या आयपीएलमधील कामगिरीवर नजर टाकायची झाल्यास, कोलकाता संघाने आतापर्यंत २ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. २०१२ आणि २०१४ साली गौतम गंभीरच्या नेतृत्त्वाखाली कोलकाता संघाने हा पराक्रम केला होता. त्यानंतर अद्याप हा संघ जेतेपदाच्या प्रतिक्षेत आहे. गतवर्षी अर्थात आयपीएल २०२१ च्या हंगामात कोलकाता संघाने अंतिम सामन्यात धडक मारली होती. परंतु त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. चेन्नई सुपर किंग्जने त्यांना पराभूत करत आयपीएल इतिहासातील त्यांचे चौथे जेतेपद पटकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL Auction: डेव्हिड वॉर्नरची घरवापसी! दिल्ली कॅपिटल्सने ‘एवढ्या’ कोटींसह घेतले विकत
रोहितच्या भिडूला नव्या लखनऊ संघाने घेतले विकत, ‘इतक्या’ कोटींसह डी कॉक ताफ्यात सामील
IPL Auction: एबीडी गेला, डू प्लेसिस आला; बेंगलोरने तब्बल ‘इतक्या’ कोटींसह केले खरेदी