भारतीय संघ सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर आहे. नुकताच या दौऱ्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाचा पराभव केला. त्यानंतर आता भारतीय संघाला ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये यजमान इंग्लंड संघालासोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी राखीव खेळाडूंमध्ये गुजरातमधील वलसाड येथील राहणारा अरजन नगवसवाला याचीही निवड झाली आहे. दरम्यान, त्याने आपल्या आयुष्यातील क्रशबद्दल खुलासा केला आहे.
अरजनचे आहेत अनेक क्रश
अरजननी 2018 मध्ये देशांतर्गत पदार्पण केले. गुजरातकडून 16 प्रथम श्रेणी सामन्यात 3.02 च्या इकोनॉमी मिळून एकूण 62 विकेट घेतले आहेत. तो आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा नेट गोलंदाज होता. क्रिकबझशी बोलताना सांगितले की, आपल्या कारकिर्दीबद्दल आणि क्रशबद्दलही सांगितले आहे.
अरजन म्हणाला की, ‘माझी इच्छा आहे की मला माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना गोलंदाजी करायची आहे.’ त्याने पुढे सांगितले की, ‘सध्या माझे अनेक क्रश आहेत. काही दिवसांपासून दिशा पाटणी मला खूप आवडते.’ सुट्टीसाठी आवडणाऱ्या जागेबद्दल विचारले तर हा गोलंदाज म्हणाला की, इंग्लंड दौरा त्याच्या आयुष्यातील पहिली विदेशी ट्रिप आहे. त्याला ही जागा खूप आवडली. याच कारणामुळे त्याला इंग्लंड हे ठिकाण सुट्टीसाठी आवडेल.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत कोणत्याही कारणाने भारताच्या 20 जणांच्या खेळाडूंमधील एखाद्या खेळाडूला खेळता आले नाही, तर अरजनला अंतिम ११ जणांच्या संघात खेळण्याची संधी मिळू शकते. असे झाल्यास 46 वर्षानंतर पारसी खेळाडू भारतीय संघामध्ये दिसून येईल. याच्या अगोदर भारतीय संघाकडून खेळणारे अखेरचे पारशी खेळाडू फारूक इंजिनीयर होते. त्यांनी 1975 मध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
जोस बटलर दुखापतीमुळे ‘या’ महत्त्वाच्या मालिकेतून बाहेर, टी२० स्पेशालिस्टची संघात निवड
“हा जल्लोष अनेक दिवस चालणार” WTC विजेतेपद मिळवून दिल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूची प्रतिक्रिया
न्यूझीलंड संघावरील अभिनंदनाचा ओघ थांबेना; ‘या’ आजी-माजी खेळाडूंनी केले अभिनंदनपर ट्विट