भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2 विश्वचषकही जिंकले आहेत.
भारताचे 331 सामन्यात नेतृत्व करणाऱ्या धोनीची मुलाखत शनिवारी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्टार स्पोर्टसवर प्रसारित करण्यात आली होती.
या मुलाखतीत त्याने त्याच्या कर्णधारपदाबद्दल काही अनुभव सांगितले आहेत. तसेच संघाचे वातावरण कसे चांगले ठेवता येते याबद्दलही धोनी बोलला आहे.
धोनी म्हणाला “माझ्या नेतृत्वाच्या कालावधीत मी मोठी गोष्ट शिकलो. बऱ्याचदा मी विचार करायचो की ही गोष्ट कॉमनसेन्स आहे. तूम्ही विचार करता की ही गोष्ट सांगायची गरज नाही. किंवा ही गोष्ट सांगण्यासारखी नाही. पण संघाच्या वातावरणात तूम्हाला सांगायची गरज असते.”
“संघात असे काहीजण असतात जे हुशार असतात आणि त्यांना वाटते की ‘अरे हा काय बोलतोय, आम्हाला हे माहित आहे.’ पण ते सर्व यांच्यासाठी नसते. ते या गोष्टी समजू शकतात. हे सांगायचे असते ते त्या व्यक्तीला ज्याला समजत नाही. पण त्याचवेळी एकाच व्यक्तीला हे सांगणे वाईट असते. कारण नंतर त्याला समजते की हा मलाच बोलत आहे. ”
पुढे धोनी नवीन खेळाडूला सामावून घेण्याबद्दल म्हणाला, “आम्ही प्रयत्न करतो की अशा वातावरणात वेळ घालवावा जिथे कंफरटेबल वाटेल. कारण ती शांतता कमी करायची असते. जोपर्यंत तो माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत मला कळत नाही त्याच्या मनात काय चालू आहे. एखाद्याला समजून घेण्यासाठी मला त्याच्याबरोबर वेळ घालवणे गरजेचे वाटते.”
“जोपर्यंत मी त्याला समजून घेत नाही तोपर्यंत त्याला काय करणे गरजेचे आहे हे सांगणे कठीण असते. कारण प्रत्येकजण वेगळा असतो.”
यामुलाखतीत धोनीने त्याच्या आयपीएलच्या आठवणीही सांगितल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
-अशी काय चुक झाली ज्यामुळे ग्लेन मॅक्सवेलने माफी मागितली
-आयसीसी टी२० क्रमवारीच्या टाॅप १० मध्ये केवळ एक भारतीय
-नदालचा हा फोटो का होतोय एवढा व्हायरल, काय आहे कारण?