आज11 एप्रिल रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएल 2025 च्या 25 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध सामना होईल. या हंगामात चेन्नई संघाला सलग चार पराभवांचा सामना करावा लागला आहे. तथापि संघाचा नियमीत कर्णधार ऋतुराज गायकवाड आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्याच्या एमएस धोनी संघाचे नेतृत्तव करणार आहे.
हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाल्यास, आयपीएलमध्ये चेन्नई आणि कोलकाता यांच्यात 30 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी सीएसकेने 19 सामने जिंकले आहेत, तर केकेआरने 10 सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. एक सामना पावसामुळे रद्द झाला. जर आपण एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सीएसके आणि केकेआर यांच्यातील सामन्यांबद्दल बोललो तर, दोन्ही संघ या मैदानावर 12 वेळा एकमेकांसमोर आले आहेत ज्यामध्ये चेन्नईने 8 सामने जिंकले आहेत, तर कोलकाता फक्त 4 सामने जिंकला आहे. जर आपण चेन्नई आणि कोलकाता यांच्यात खेळलेल्या शेवटच्या 5 सामन्यांबद्दल बोललो तर चेन्नई तिथेही पुढे आहे. दोन्ही संघांमध्ये झालेल्या पाच सामन्यांपैकी चेन्नईने तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर कोलकाता दोन वेळा विजय मिळवण्यात यशस्वी झाला आहे. अश्या स्थितीत आज कोण बाजी मारणार हे पाहणे रंजक ठरेल.
सीएसके विरुद्ध केकेआर शेवटच्या 5 सामन्यांचे निकाल
चेन्नई सुपर किंग्ज 7 विकेट्सनी जिंकले
कोलकाता नाईट रायडर्स 6 विकेट्सनी विजयी
चेन्नई सुपर किंग्ज 49 धावांनी जिंकले
कोलकाता नाईट रायडर्स 6 विकेट्सनी विजयी
चेन्नई सुपर किंग्ज 27 धावांनी जिंकले






