---Advertisement---

अफगाणिस्तानच्या कर्णधाराने घडवला इतिहास; ‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीचा विश्वविक्रम काढला मोडीत

On: रविवार, मार्च 21, 2021 1:54 PM
---Advertisement---

अबुधाबी। शनिवारी (20 मार्च) अफगाणिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे संघात तिसरा टी20 सामना पार पडला. हा सामना अफगाणिस्तानने 47 धावांनी जिंकला. याबरोबरच अफगाणिस्तानने या मालिकेत 3-0 असा विजय देखील मिळवला. यामुळे अफगाणिस्तानचा कर्णधार असगर अफगाणने मोठा विश्वविक्रम केला आहे.

या विजयामुळे असगर अफगाण आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने आत्तापर्यंत 52 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात अफगाणिस्तानचे नेतृत्व केले आहे. त्यातील 42 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 9 सामन्यात पराभव स्विकारला असून 1 सामना बरोबरीत सुटला आहे.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत अफगाणने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला आहे. धोनीनेही कर्णधार म्हणून 71 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात नेतृत्व केले आहे, ज्यातील 41 आंतरराष्ट्रीय टी20 सामने जिंकले आहेत.

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गन आहे. त्याने 33 आंतरराष्ट्रीय टी20 सामने कर्णधार म्हणून जिंकले आहेत. याशिवाय पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमदने 29 तर वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने कर्णधार म्हणून संघासाठी 27 सामने जिंकले आहेत.

झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसर्‍या टी20 मध्ये अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 विकेट्सच्या मोबदल्यात 183 धावा केल्या. त्यास उत्तर म्हणून झिम्बाब्वेचा संघ 5 विकेट्सच्या मोबदल्यात 136 धावाच करू शकला. त्यामुळे अफगाणिस्तानने हा सामना जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताने घेतले ‘हे’ अजब निर्णय, ज्याची कारणे आहेत अनाकलनीय

आयपीएल इतिहासातील चार भारतीय ‘वन मॅच वंडर’

गुणवत्ता असूनही भारतीय संघात ‘या’ खेळाडूंना नाही मिळाली पुरेशी संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---