---Advertisement---

इंग्लंडचा गोलंदाज हॅट्रिकवर असताना ऑस्ट्रेलियाने केला डाव घोषित, सिडनी कसोटीवर यजमानांचे वर्चस्व

On: शनिवार, जानेवारी 8, 2022 2:47 PM
Jack Leach and Marnus Labuschagne
---Advertisement---

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) संघातील ऍशेस २०२१-२२ मालिकेचा (Ashes 2021-22) चौथा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू आहे. या सामन्यात चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाने दमदार शतक झळकावले. त्यामुळे या सामन्यावर ऑस्ट्रेलियाने आपली पकड मजबूत केली आहे. चौथ्या दिवसाखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात ११ षटकात बिनबाद ३० धावा केल्या असून अद्याप अखेरच्या दिवशी त्यांना ३५८ धावांची गरज आहे.

उस्मान ख्वाजाच्या शतकाने ऑस्ट्रेलिया मजबूत
ऑस्ट्रेलियाने त्यांचा दुसरा डाव ६८.५ षटाकात ६ बाद २६५ धावांवर घोषित केला. तसेच पहिल्या डावातील १२२ धावांच्या आघाडीसह इंग्लंडसमोर ३८८ धावांचे आव्हान ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून या डावात उस्मान ख्वाजाने शतकी खेळी केली. त्याने १३८ चेंडूत नाबाद १०१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १० चौकार आणि २ षटकर मारले. त्याचे या सामन्यातील हे दुसरे शतक आहे. त्याने पहिल्या डावात १३७ धावांची खेळी केली होती.

ख्वाजाव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात कॅमेरॉन ग्रीनने देखील अर्धशतकी खेळी केली. त्याने १२२ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७४ धावा केल्या. तसेच मार्कस हॅरिस (२७), मार्नस लॅब्यूशेन (२९) आणि स्टीव्ह स्मिथ (२३) यांनी २० धावांचा टप्पा ओलांडला.

इंग्लंडकडून दुसऱ्या डावात जॅक लीचने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तसेच मार्क वूडने २ विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे जॅक लीचला या डावात हॅट्रिक घेण्याची संधी होती. मात्र, ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव त्याचे षटक सुरू असतानाच घोषित केल्याने त्याची ही संधी हुकली. त्याने ६९ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कॅमेरॉन ग्रीन आणि पाचव्या चेंडूवर ऍलेक्स कॅरेला बाद केले होते. मात्र तो सहावा चेंडू टाकायच्या आधीच ऑस्ट्रेलियाच्या संघाने डाव घोषित केला.

इंग्लंडला संघ २९४ धावांवर सर्वबाद
इंग्लंडने चौथ्या दिवशी पहिल्या डावातील ७१ व्या षटकापासून आणि ७ बाद २५८ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र, दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडने या डावातील उर्वरित तिन्ही विकेट्स झटपट गमावल्या. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव ७९.१ षटकात २९४ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे त्यांना १२२ धावांची पिछाडी स्विकारावी लागली.

इंग्लंडकडून पहिल्या डावात जॉनी बेअरस्टोने शतकी खेळी केली. त्याने १५८ चेंडूत ११३ धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त बेन स्टोक्सने ६६ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच मार्क वूडने तळात ३९ धावांचे योगदान दिले.

ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तसेच पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मिशेल स्टार्क आणि कॅमेरॉन ग्रीनने प्रत्येकी १ विकेट घेतली.

अधिक वाचा – ऍशेस मालिका तर गमावलीच, पण इंग्लंडने ‘या’ नकोशा विक्रमात केली बांगलादेशची बरोबरी

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर 
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ४१६ धावांवर पहिला डाव घोषित केला आहे. ऑस्ट्रेलियाकडून या डावात उस्मान ख्वाजाने १३७ धावांची शतकी खेळी केली. तसेच स्टीव्ह स्मिथने ६७ धावा केल्या. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

खुद्द ब्रँड अँबेसेडर अमिताभ यांनाही मिळाली चुकीची माहिती, ‘या’ लीगमध्ये सहभागी नाही होणार सचिन

जन्माने पाकिस्तानी असलेला ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा सचिन-विराटला ‘या’ बाबतीत ठरलाय वरचढ

Ashes | धडाक्यात पुनरागमन काय असतं ते ‘उस्मान ख्वाजा’ने दाखवलंय, लागोपाठ दोन शतकांसह मोठा विक्रम नावावर

व्हिडिओ पाहा – संघाला कठीण परिस्थितीतून सावरणारे ५ गोलंदाज

संघाला कठीण परिस्थितीतून सावरणारे ५ गोलंदाज | 5 Memorable Last Overs

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---