इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या पुढच्या महिन्यात ऍशेस मालिका सुरू होणार आहे. मालिका ऑस्ट्रेलियामध्ये खेळली जाणार आहे. यापूर्वी स्टेडियमवर दोन्ही देशांच्या चाहत्यांना खेळाडूंशी गैरवर्तन करताना पाहिले गेले आहे. याच पार्श्वभूमीवर इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार जो रूटने ऑस्ट्रेलियन चाहत्यांना चेतावणी दिली होती. त्यानंतर आता इंग्लंड संघाचे संचालक एश्ले जाइल्स यांनी देखील रूटने घेतलेल्या या भूमिकेचे समर्थन केले आहे.
जो रूट ऑस्ट्रेलियान चाहत्यांच्या चेतावणी देताना म्हणाला की, जर ऑस्ट्रेलियाचे चाहत्यांनी इग्लिश संघासोबत शिवीगाळ केली तर जे योग्य असेल ते केले जाईल. आता इंग्लंड संघाचे संचालक जाइल्स यांनी देखील याविषयावर त्यांचे मत मांडले आहे. त्यांच्या मते गैरवर्तन करणाऱ्या प्रेक्षकांवर कारवाई केली गेली पाहिजे. जाइल्स म्हणाले की, ” मला वाटते आमच्या खेळाडूंनी कसल्याही प्रकारच्या गैरव्यवहाराचे शिकार झाले नाहीत पाहिजे. विशेषतः वंशभेदाचे शिकार तर अजिबात झाले नाही पाहिजेत.”
काही दिवसांपूर्वी इंग्लंड संघाचे माजी दिग्गज कर्णधार मायकल वॉन यांच्यावर यॉर्कशायरचे माजी खेळाडू अजीम रफीक यांनी वर्णभेदाचे आरोप केले होते. त्यानंतर वॉनला बीसीसीच्या ऍशेस मालिकेच्या समालोचन पॅनलमधून बाहेर केले गेले होते. यासंदर्भात जाइल्स म्हणाले की, आपण सर्वच चुका करतो आणि आपण पुन्हा करणार. मात्र, आपण सहन करण्यात, शिक्षित करण्यात आणि पुनर्वसन करण्यात सक्षम असले पाहिजे. त्याच्याशिवाय लोक उघडपणे त्यांचा अनुभव सांगणार आणि शिकणार नाहीत.”
दरम्यान, आगामी ऍशेस मालिका पुढच्या डिसेंबर महिन्यात ८ तासखेपासून खेळली जाणार आहे. पहिला सामना ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेनमधील गाबा स्टेडियमवर खेळला जाईल. दुसरा सामना १६ डिसेंबरपासून एडिलेड स्टेडियमवर सुरु होईल. तिसरा सामना २६ डिसेंबर पासून मेलबर्नमध्ये, चौथा सामना ५ जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळला जाईल. तर पाचवा आणि शेवटचा सामना १४ जानेवारीपासून पर्थ स्टेडियमवर सुरू होईल.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया कसोटी संघाच नियमित कर्णधार टिम पेनने संघाचे नेतृत्व सोडले आहे. त्याच्या जागी ऑस्ट्रेलिया संघाच्या नेतृत्वाची जबावदारी वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सवर सोपविण्यात आली आहे. तर संघाच्या उपकर्णधाराची जबाबदारी स्टीव स्मिथवर सोपवली गेली.