हेडिंग्ले कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलिया संघाला 3 विकेट्सने पराभूत केले. या पराभवानंतर पॅट कमिन्सने मोठे भाष्य केले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कमिन्सला सामन्यानंतर विचारण्यात आले की, आता मालिकेतील इंग्लंडच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे का? यावर कमिन्सने स्पष्ट नकार दर्शवला. त्याने म्हटले की, मालिकेत ऑस्ट्रेलिया अजूनही पुढे आहे आणि त्यामुळे माहोल इंग्लंडकडे गेला नाहीये.
‘आम्ही मालिकेत अजूनही 2-1ने पुढे’
सामन्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याला विचारण्यात आले की, आता मालिकेतील इंग्लंडच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना कमिन्स म्हणाला की, “असे बिल्कुल नाहीये. कारण, स्कोरलाईन 2-1 आहे. या पराभवाचा ऑस्ट्रेलियावर फरक पडणार नाही. प्रत्येक सामन्यात तुम्ही नव्याने सुरुवात करता. आम्ही खूप क्रिकेट खेळलो आहोत आणि हा सामना मागे सोडून आम्ही मॅनचेस्टरमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी पूर्णपणे तयार असू.”
हेडिंग्ले (Headingley) येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंड संघाने ऑस्ट्रेलियाला 3 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. या विजयासोबतच इंग्लंडने मालिकेत शानदार पुनरागमन केले आहे. ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडपुढे 251 धावांचे आव्हान ठेवले होते. यजमान इंग्लंडने हे आव्हान चौथ्या दिवशी 7 विकेट्स गमावत पूर्ण केले. पहिल्या डावात खराब फलंदाजीचा फटका ऑस्ट्रेलियाला बसला आणि त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढावली.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यात विजय मिळवला होता. तसेच, मालिकेत 2-0ने आघाडी घेतली होती. त्यांनी हेडिंग्ले कसोटी सामना जिंकला असता, तर ही मालिका त्यांच्या नावावर झाली असती. मात्र, इंग्लंडने शानदार पुनरागमन करत सामना जिंकला. तसेच, ऍशेस 2023 (Ashes 2023) मालिकेतील आव्हान कायम राखले. (ashes 2023 aussie skipper pat cummins doesnt believe momentum shifted to englands favor)
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या कसोटीत कांगारूंची पिसे काढणाऱ्या खेळाडूवर स्टोक्स फिदा; म्हणाला, ‘अशा खेळाडूमुळेच मजबूती…’
धोनीच्या ‘त्या’ सर्वात मोठ्या विक्रमाला स्टोक्सकडून तडा, नवा कीर्तिमान रचत घडवला इतिहास