---Advertisement---

लॉर्ड्स कसोटीवरही पाहुण्या ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड! अखेरच्या दिवशी विजय 6 बळी दूर

On: शनिवार, जुलै 1, 2023 11:41 PM
---Advertisement---

प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऍशेस कसोटी मालिकेतील दुसरा सामना लंडन येथे लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा पाहुणे ऑस्ट्रेलिया संघाने सामन्यावरील आपली पकड मजबूत केली होती. इंग्लंडला विजयासाठी दिलेल्या 371 धावांचा बचाव करताना ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचे चार फलंदाज 114 धावांवर बाद झाले आहेत. अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्यासाठी केवळ सहा बळी आवश्यक आहेत.

मालिकेतील पहिले कसोटी जिंकल्यानंतर दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघ आघाडी घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता. स्टीव्ह स्मिथच्या शानदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 416 धावा बनवल्या. इंग्लंड आपल्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या या धावांच्या फारसा जवळ जाऊ शकला नाही. डकेट व रूट यांच्या फलंदाजीमुळे ते 315 पर्यंत मजल मारू शकले. उस्मान ख्वाजाच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावात 279 धावा केल्या व यजमान संघासमोर विजयासाठी 371 धावांचे लक्ष ठेवले.

चौथ्या दिवसाचा 31 षटकांचा खेळ शिल्लक असताना फलंदाजी साठी उतरलेल्या इंग्लंडला स्टार्कने सुरुवातीला दोन धक्के दिले. क्राऊली व पोप प्रत्येकी तीन धावांवर बाद झाले. अनुभवी जो रुट 18 व ब्रूक 4 धावांवर तंबूत परतल्याने इंग्लंडची अवस्था 4 बाद 45 अशी झाली होती. त्यानंतर बेन डकेट व बेन स्टोक्स यांनी नाबाद भागीदारी करत संघाचा डाव सावरला. अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे पारडे जड असून त्यांना मालिकेत आघाडी घेण्याची संधी आहे.

(Ashes 2023 Australia Ahead In Lords Test England Need 371)

महत्वाच्या बातम्या-
‘मी तर हार्दिक पंड्याच्या आसपासही नाही…’, संघातून ड्रॉप करण्यावर प्रमुख खेळाडूचे खळबळजनक विधान
वनडे विश्वचषकात भारतासाठी चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? ‘हे’ आहेत पाच पर्याय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---