ऐतिहासिक ऍशेस मालिका बुधवारी (16 जून) सुरू झाली. ऍशेस 2023चा पहिला सामना बर्मिंघमच्या एजबस्टन स्टेडियमवर फार पडला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (20 जून) ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला. उभय संघांतील हा सामना चाहत्यांसाठी एक रोमांचक मेजवानी ठरली. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत दोन्ही संघ विजयाच्या प्रयत्नात होते. पण अखेरीस ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. पॅट कमिन्स याने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली आणि दोन विकेट्स राखून विजय मिळवला.
शेवटच्या डावात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 281 धावांचे लक्ष्य मिळाले होते. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 3 बाद 107 धावा केल्या होत्या. शेवटच्या दिवशी त्यांना विजयासाठी एकूण 174 धावा हव्या होत्या. शेवटच्या दिवशी हे लक्ष्य ऑस्ट्रेलियासाठी मोठे नव्हते. मात्र, ऐन वेळी पावसाने हजेरी लावली आणि शेवटच्या दिवसाचे पहिले सत्र पूर्णपणे रद्द करावे लागले. पाऊस थांबल्यानंतर दोन्ही संघ थेट दुपारचे जेवण करूनच मैदानात उतरले. दुसऱ्या सत्राच्या शेवटची ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 5 बाद 183 धावा होती. उस्मान ख्वाजा () खेळपट्टीवर संयमी खेळ दाखवत होता. पण नंतर ख्वाजानेही विकेट गमावली आणि सामना ऑस्ट्रेलियाच्या हातातून निसटताना दिसत होता. पण अशातच पॅट कमिन्स संघासाठी खेळपट्टीवर टिकून राहिला.
उस्मान ख्वाजाने पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावात देखील ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा केल्या. यावेळी तो 197 चेंडू खेळून 65 धावांची खेळी करू शकला. ऑस्ट्रेलियाच्या विजयात ख्वाजा आणि कमिन्स यांची भूमिका सर्वात महत्वाची राहिली, असे म्हणता येईल. वेगवान गोलंदाज कमिन्स या सामन्यात शेवटच्या षटकांमध्ये खेळपट्टीवर टिकून राहिला आणि संघाला विजय मिळवून दिला. कमिन्सने 73 चेंडूत 44 धावा केल्या. तत्पूर्वी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात कमिन्सने 4 विकेट्सही घेतल्या होत्या.
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्मय घेतला. पहिल्या डावात इंग्लंडने 8 बाद 393 धावा केल्या आणि डाव घोषित केला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने 386 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात इंग्लंडने 7 धावांची आघाडी मिळवल्यानंतर दुसऱ्या डावात त्यांचा संघ 273 धावांवर सर्वबाद झाला. शेवटच्या डावात ऑस्ट्रेलियाला मिळालेले 281 धावांचे लक्ष्य संघाने 92.3 षटकांमध्ये गाठले. ऑस्ट्रेलियाच्या विजयात फिरकीपटू नेथन लायन याचेही योगदान महत्वाचे राहिले. लायनने पहिल्या आणि दुसऱ्या डावात प्रत्येकी चार चार विकेट्स घेतल्या. (Ashes 2023 AUSTRALIA HAVE DEFEATED ENGLAND AT EDGBASTON.)
महत्वाच्या बातम्या –
Ashes 2023 । स्मिथवर मान खाली घालण्याची वेळ! कारकिर्दीवर लागलेला डाग प्रेक्षकांनी पुन्हा दाखवून दिला
एमपीएलमध्ये केदार जाधवच्या कोल्हापूरचा शानदार विजय, पाहा कुणी केल्या किती धावा?