इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या बलाढ्य देशांमध्ये सुरू असलेल्या ऍशेस मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात स्टीव्ह स्मिथ याने शानदार विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऍशेस मालिका 2023 मधील दुसऱ्या सामन्यात लॉर्ड्स येथे स्मिथने 1000 चौकार मारण्याचा विक्रम रचला आहे.
स्मिथचा विक्रम
आपला 99वा कसोटी सामना खेळत असलेला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने इंग्लंडविरुद्ध्या पहिल्या डावात 15 चौकारांचा पाऊस पाडला होता. तसेच, दुसऱ्या डावात त्याने 5 चौकार ठोकले. या 20 चौकारांच्या मदतीने स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या चौकरांची संख्या 1000च्या पार नेली आहे. अशाप्रकारे तो ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत 1000 चौकार मारणारा पाचव्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे.
स्मिथ बनला पाचवा फलंदाज
स्टीव्ह स्मिथ याने पहिल्या डावात शानदार फलंदाजी करत 184 चेंडूंचा सामना करताना 110 धावांची वादळी खेळी साकारली. या धावा करताना त्याने 15 चौकारांचा पाऊस पाडला. यानंतर दुसऱ्या डावात स्मिथ 34 धावांवर तंबूत परतला. या डावात त्याने 5 चौकारांची बरसात केली. दोन्ही डावात मिळून स्मिथने एकूण 20 चौकार मारले. स्मिथने आपल्या 99व्या कसोटी सामन्यात 1000हून अधिक चौकार मारण्याचा विक्रम केला आहे. तो अशी कामगिरी करणारा पाचवा ऑस्ट्रेलियन फलंदाज बनला आहे.
ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज
1509- रिकी पाँटिंग (सामने- 168)
1175- स्टीव वॉ (सामने- 168)
1161- ऍलन बॉर्डर (सामने- 156)
1049- मॅथ्यू हेडन (सामने- 103)
1004- स्टीव स्मिथ (सामने- 99*)
कसोटी सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम सचिनच्या नावे
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर त्यात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) अव्वलस्थानी आहे. सचिनने 200 कसोटी सामन्यात एकूण 2058 चौकार मारले होते. दुसऱ्या स्थानी भारतीय संघाचा माजी फलंदाज राहुल द्रविड आहे. त्याने 164 सामन्यात 1654 चौकार मारले होते. तसेच, तिसऱ्या स्थानी वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा असून त्याने 131 सामन्यात 1559 चौकार मारले होते. याव्यतिरिक्त चौथ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे. त्याने 168 सामन्यात 1509 चौकार मारले होते. (ashes 2023 eng vs aus cricketer steve smith hit 1000 fours in test cricket)
महत्वाच्या बातम्या-
बॅटच नाही, तर फिल्डिंगमध्येही रुटची धमाल! चित्त्याची चपळाई दाखवत एका हाताने पकडला कॅच, पाहा Video
BIG BREAKING: दोन वेळचे विश्वविजेते वेस्ट इंडीज वर्ल्डकपसाठी पात्र ठरण्यात अपयशी, स्कॉटलंडने पराभूत करताच अपेक्षाभंग