---Advertisement---

तिसऱ्या कसोटीत घाबरला बेअरस्टो! क्रीझमध्येच थांबल्याचे पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडूही लागले हसू, Video

On: शुक्रवार, जुलै 7, 2023 5:31 PM
Jonny-Bairstow
---Advertisement---

ऍशेस 2023 मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला 4 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यातील जॉनी बेअरस्टो क्रीझच्या बाहेर गेल्यामुळे त्याला यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरे याने बाद केले होते. हा मुद्दा वादाचा विषय ठरला होता. त्यानंतर आता तिसऱ्या कसोटीत आपल्याकडून चूक होऊ नये म्हणून बेअरस्टोने खूपच सावधगिरी बाळगली.  तो जेव्हा फलंदाजीला आला, तेव्हा त्याने चेंडू खेळल्यानंतर सावधगिरी बाळगली.

नेमकं काय घडलं?
झालं असं की, जेव्हाही तिसऱ्या कसोटीत षटक संपायचे किंवा चेंडू डक करायचा, तेव्हा जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) शेवटपर्यंत क्रीझच्या आतच थांबायचा. जेव्हा षटक संपायचे आणि खेळाडू जागा बदलायचे, तेव्हाच तो क्रीझच्या बाहेर पडायचा. त्याची ही कृती पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडूही हसून मजा लुटताना दिसले. तसेच, स्मिथ आणि ऍलेक्स कॅरे यांनी बेअरस्टोच्या या कृतीवर मजा घेताना दिसले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून चाहते मजा घेत आहे.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना 263 धावाच केल्या होत्या. यामध्ये मिचेल मार्श (Mitchell Marsh) याने सर्वाधिक 118 धावांची शतकी खेळी साकारली. ज्यावेळी पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा इंग्लंडच्या 68 धावांवर 3 विकेट्स पडल्या होत्या. यावेळी क्रीझवर बेअरस्टो 1 धावेवर आणि जो रूट (Joe Root) 19 धावांवर नाबाद खेळत होता. मात्र, दुसऱ्या दिवशी बेअरस्टो खास कामगिरी करू शकला नाही. बेअरस्टोने यादरम्यान 37 चेंडू खेळले आणि फक्त 12 धावाच केल्या. यामध्ये 2 चौकारांचा समावेश होता.

मिचेल मार्शचा विक्रम
तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मिचेल मार्श याने कसोटी कारकीर्दीतील तिसरे शतक ठोकले. खरं तर, मार्शने 102 चेंडूत शतक साजरे केले. तसेच, खास विक्रमही आपल्या नावावर केला. मार्श इंग्लंडमध्ये वेगवान शतक झळकावणारा दुसरा ऑस्ट्रेलियन फलंदाजही बनला. इंग्लंडमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियन फलंदाज व्हिक्टर ट्रम्पर यांच्या नावावर आहे. त्यांनी 1902मध्ये इंग्लंडविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीत 95 चेंडूत शतक ठोकले होते. तसेच, मार्शने 67 महिन्यांनंतर कसोटीत शतक झळकावले. मार्शने यापूर्वी 2018मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिले शतक ठोकले होते. (ashes 2023 eng vs aus jonny bairstow stuck inside the crease due to fear see video)

महत्वाच्या बातम्या-
Ashes 2023 । ‘ऑस्ट्रेलियन चाहते माझा तिरस्कार करतात…’, शतकानंतर समोर आल्या मार्शच्या वेदना
टीम इंडियातून हाकालपट्टी होताच पुजाराने बॅटमधून दिले सडेतोड प्रत्युत्तर, ‘या’ स्पर्धेत ठोकले तडाखेबंद शतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---