इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी ऍशेस कसोटी रंगात आली आहे. गुरुवारी (6 जुलै) सुरू झालेला ही हेडिंग्ले कसोटी तिसऱ्या दिवसी रोमांचक वळणावर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडला विजयासाठी 251 धावांचे आव्हान मिळाले असून त्यांना अजून 224 धावा करायच्या आहेत.
सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावात 4 बाद 116 धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी पावसाने व्यत्यय आणल्यामुळे पहिल्या दोन सत्रांमध्ये एकही चेंडू खेळला गेला नाही. तिसऱ्या सत्रात जास्त षटके खेळता यावी म्हणून दोन्ही संघांनी जेवण आणि चहापाण वेळेआधीच करून घेतले. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळला, पण एकटा ट्रॅविस हेड मात्र, संयमी खेळ दाखव्यामुळे खेळपट्टीवर टिकून राहिला. हेडने 112 चेंडूत 77 धावांची खेळी केली.
तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने एकही विकेट न गमावता 27 धावा केल्या. झॅक क्रावली आणि बेन डकेत यांनी अनुक्रमे 9* आणि 18* धावांची खेळी केली असून दोघेही खेळपट्टीवर कायम आहेत. ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या दिवसाखेर नाबाद राहिलेला मिचेल मार्श 28 धावा करून तंबूत परतला. यष्टीरक्षक ऍलेक्स केरी 5, मिचेल स्टार्क 16, तर कर्णधार पॅट कमिन्स 16 धावांवर तंबूत परतले. शेवटच्या विकेटसाठी टॉड मर्फी आणि ट्रेविस हेड यांच्यात 41 धावांची भागीदारी झाली. पण मर्फी वैयक्तिक 11 धावा करून स्टुअर्ट ब्रॉडची शिकार बनला. त्यानंतर मार्क वुडच्या गोलंदाजीवर लागोपाठ दोन षटकार मारले आणि आपली धावसंख्या 77 पर्यंत नेली.
स्टुअर्ट ब्रॉडने दुसऱ्या डावात एकूण 3 विकेट्स घेतल्या, त्यापैकीच एक हेड होता. ख्रिस वॉक्स याने 3, तर मार्क वुड आणि मोईन अळी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स या डावात घेतल्या. (Ashes 2023 England have a target of 251 runs in the last innings to win the Headingley Test)
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघ आशिया ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 च्या उपांत्यपूर्व फेरीत
विश्वचषक 2023मध्ये खेळणार की नाही पंत? समोर आलेली अपडेट खूपच महत्त्वाची