---Advertisement---

Ashes 2023: पहिल्या कसोटीत इंग्लंडचा नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय, ऑस्ट्रेलिया संघातून स्टार्क बाहेर

On: शुक्रवार, जून 16, 2023 3:46 PM
Pat Cummins Ben Stokes
---Advertisement---

क्रिकेट जगतातील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका असलेल्या ऍशेस मालिकेला शुक्रवारी (16 जून) सुरुवात झाली. ऍजबस्टन येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत यजमान इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. नुकतीच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकून आलेल्या ऑस्ट्रेलियाने या सामन्यात आपल्या संघात एक महत्त्वाचा बदल केला. अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याच्या जागी जोश हेजलवूड याने संघात पुनरागमन केले.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरून ग्रीन, ऍलेक्स केरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लायन, जोश हेझलवूड, स्कॉट बोलँड

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): बेन डकेट, झॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन.

(Ashes 2023 England Won Toss And Elected To Bat First Starc Missed For Australia)

महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघाने रचला इतिहास! ‘या’ खेळात पहिल्यांदाच मिळवली सेमीफायनलमध्ये जागा
‘तुझ्यामुळे भारत विश्वचषक जिंकत नाहीये’, ट्रोलरने आकाश चोप्राला केले ट्रोल, म्हणाला, ‘मी घेतो जबाबदारी’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---