इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील लॉर्ड्स कसोटी सामना रविवारी (02 जुलै) चांगलाच रंगात दिसला. इंग्लंडला शेवटच्या दिवशी विजयासाठी 257 धावांची गरज होती. शेवटच्या दिवसी मैदानात दबावाची परिस्थिती होती. मात्र, इंग्लंडसाठी कर्णधार बेन स्टोक्स खेळपट्टीवर टिकून राहिला आणि शतक केले. स्टोक्सच्या वादळी खेळीमुळे इंग्लंडच्या विजयाच्या आशा कायम होत्या. स्टोक्सने यादरम्यान षटकारांची हॅट्रिक देखील केली.
चौथ्या दिवसाखेर इंग्लंडची धावसंख्या 4 बाद 114 होती. तिसऱ्या दिवशी बेन डकेत आणि बेन स्टोक्स यांनी दिवसाची सुरुवात केली. त्यावेली डकेत 50 आणि स्टोक्स 29 धावा केल्या होत्या. शेवटच्या दिवसी इंग्लंडला पहिला झटका बेन डकेतच्या रूपात मिळाला. त्याने संघासाठी वैयक्तिक 83 धावांची खेली केली. पाचव्या दिवसाचे पहिले सत्र संपण्यापूर्वी बेन स्टोक्स () याने वादली खेळी केली आणि नाबाद 108 धावा कुटल्या. शतक करण्यासाठी त्याने 142 चेंडू खेळले. शतकातील शेवटच्या 47 धावा करण्यासाठी त्याने अवघ्या चार षटकांची म्हणजेच 24 चेंडूंची मदत घेतली.
इंग्लंडच्या शेवटच्या डावातील 56वे षटक ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीन याने टाकले. ग्रीनच्या या षटकातील पहिल्या चेंडूवर स्टोक्सने आक्रमण करायला सुरुवात केली. पुढचा चेंडू ग्रीनने वाईड टाकला ज्यावर इंग्लंडला अधिकची एक धाव मिळाली. षटकाचील पुढच्या तिन्ही चेंडूवर स्टोक्सने लागोपाठ तीन षटकार मारले. चाहत्यांना स्टोक्सची ही वादळी खेळी पाहून कसोटीत टी-20 क्रिकेटचा भास झाला. (Ashes 2023 In lords Test Ben Stokes Scroed Century on last day)
बातमी अपडेट होत आहे…
विम्बल्डनचा पहारेकरी आहे ‘हा’ ससाणा! 15 वर्षांपासून करतोय टेनिस कोर्टचे रक्षण; वाचा सविस्तर
“भारत-पाकिस्तान सामन्याला दर्जा राहिला नाही”, माजी कर्णधाराची तिखट प्रतिक्रिया