इंग्लंडच्या एजबॅस्टन येथे ऍशेस मालिका 2023चा पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. 16 जूनपासून खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्याच दिवशी 8 विकेट्स गमाव त 393 धावांवर डाव घोषित केला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 386 धावा चोपल्या, तर इंग्लंडने दुसऱ्या डावात 273 धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 विकेट्स गमावत 107 धावा केल्या आहेत. यादरम्यान इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज जोडीने खास विक्रम रचला आहे.
कोण आहे ती जोडी?
ऍशेस 2023 (Ashes 2023) मालिकेच्या पहिल्या कसोटीत खास विक्रम नावावर करणारी इंग्लंडची गोलंदाज जोडी जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड (James Anderson And Stuart Broad) यांची आहे. खरं तर, स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने पहिल्या डावापासूनच आपल्या भेदक गोलंदाजीने फलंदाजांवर दबाव निर्माण केला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता, तर जेम्स अँडरसन (James Anderson) याला एक विकेट घेण्यातच यश आले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाच्या चौथ्या दिवशी ब्रॉडने 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
काय आहे विक्रम?
अशाप्रकारे ऍशेस मालिकेत या दोघांच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. या जोडीने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मायदेशात खेळताना सर्वाधिक चेंडू टाकले आहेत. मायदेशात कसोटीत सर्वाधिक चेंडू टाकण्याचा विक्रम करण्याच्या बाबतीत अव्वलस्थानी श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) आहेत. त्याने एकूण 25061 चेंडू टाकले आहेत.
यानंतर दुसऱ्या स्थानी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आहे. त्याने आपल्या मायदेशात कसोटीत 22000 हून अधिक चेंडू टाकले आहेत. हा पराक्रम त्याने ऍशेस मालिकेत गाजवला. तिसऱ्या स्थानी भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे (Anil Kumble) असून त्याने 20792 चेंडू टाकले होते. तसेच, चौथ्या स्थानी शेन वॉर्न (Shane Warne) असून त्याने मायदेशात कसोटीत 19417 चेंडू टाकले होते, तर 19048 चेंडूंसह स्टुअर्ट ब्रॉड पाचव्या स्थानी आहे. (ashes 2023 james anderson and stuart broad rocking performance bowled most balls in test on home soil read more)
मायदेशात कसोटीत सर्वाधिक चेंडू टाकणारे दिग्गज गोलंदाज
25061 चेंडू- मुथय्या मुरलीधरन
22004 चेंडू- जेम्स अँडरसन*
20792 चेंडू- अनिल कुंबले
19417 चेंडू- शेन वॉर्न
19048 चेंडू- स्टुअर्ट ब्रॉड*
महत्वाच्या बातम्या-
MPL 2023: नाशिक टायटन्सच्या विजयाची हॅट्रिक! शतकासह चार बळी घेत अर्शिनची अष्टपैलू कामगिरी
ASHES 2023: ऍजबस्टन कसोटी रंगतदार अवस्थेत, अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 174 धावांची गरज