ऍशेस 2023च्या शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 384 धावांचे लक्ष्य मिळाले. इंग्लंड संघाचा दुसरा डाव 395 धावांवर गुडाळला गेला. रविवारी (30 जुलै) सामन्याच्या चौथ्या दिवशी जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड खेळपट्टीवर आले. अँडरसनला स्टॅन्डमध्ये उपस्थित चाहत्यांकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा मिळाल्या.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यातील हा पाचवा आणि शेवटचा ऍशेस (Ashes 2023) कसोटी सामना केविंगटन ओव्हल स्टेडियमवर सुरू आहे. रविवारी जेम्स अँडरसन (James Anderson) आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. अशात सामन्याच्या चौथ्या दिवशी अँडरसन मैदानात उतरतानाच स्टॅन्डमधून चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अँडरसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज असून मायदेशातील या कसोटी सामन्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावल्याचे दिसले. अँडरसनला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी सोबत ट्रंपेट आणि इथर काही म्युजिकल इंस्ट्र्यूमेंट्स आणल्याचे पाहायला मिळाले. चाहत्यांनी हे वाद्य वाजवून लाईव्ह सामन्यादरम्यान अँडरसनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
जेम्स अँडरस 2002 साली इंग्लंडसाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला असून अद्यापही निवृत्तीचा विचारात दिसत नाहीये. त्याची कारकीर्द 20 पेक्षा अधिक वर्ष लावली असली, तरी प्रदर्शन आजही एखाद्या नवघ्या गोलंदाजाला लाजवण्यासाठी काफी आहे. अँडरसनच्या आंतराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत 976 विकेट्स गेतल्या आहेत. मुथय्या मुरलीधर आणि शेन वॉर्न यांच्यानंतर अँडरसन सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या विकेट्सचा आकडा सध्या 690* आहे.
दरम्यान, सामन्याच्या दिसऱ्या दिवसी इंग्लंडची धावसंख्या दुसऱ्या डावात 9 बाद 389 धावा होती. स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन यांनी चौथ्या दिवसी 6 धावा केल्यानंतर त्यांचा डाव गुंडाळला गेला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ओव्हल कसोटी त्याचा शेवटचा क्रिकेट सामना असल्याचे त्याने सांगितले. अशात चाहत्यांना ब्रॉड-अँडरसन जोडी पुन्हा एकत्र खेळताना दिसणार नाही, हेदेखील निश्चित झाले. या दोघांनी एकत्र खेळताना सर्वाधिक 1037* विकेट्स घेतल्या आहेत. ओव्हल कसोटीच्या शेवटच्या डावात हा आकडा वाढू शकतो. दरम्यान, शेवटच्या डावात उस्मान ख्वाजा आणि डेविड वॉर्नर यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात देत 100 धावांची नावाद भागीदारी केली आहे. (James Anderson received birthday wishes from fans during the live match)
महत्वाच्या बातम्या –
एअर होस्टेसनं पार केली हद्द! धोनी झोपेत असताना काढला व्हिडिओ, चाहत्यांचा आक्षेप
‘अँडरसन-ब्रॉडची जोडी नेहमी स्मरणात राहील’, द्रविडने सांगितले इंग्लिश दिग्गजाचे संघातील महत्व