इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा ऍशेस सामना बुधवारी (28 जून) सुरू झाला. उभय संघांतील ऍशेस मालिकेचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सने जिंकला. मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. या ऐतिहासिक क्रिकेट स्टेडियमवर या सामन्याची सुरुवात अपेक्षित पद्धतीने होऊ शकली नाही. तेल विरोधी आंदोलन करणारे दोन आंदोलक लाईव्ह सामन्यादरम्यान मैदानात आले. पण यावेळी अधिक चर्चेचा विषय ठरला तो जॉनी बेअरस्टो.
जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) दुखापतीमुळे मागच्या काही महिन्यांमध्ये क्रिकेटच्या मैदानातून बाहेर होता. यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातील त्याने मैदानात पुनरागमन केले आणि संघाला त्याच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. ऍशेसच्या (Ashes 2023) पहिल्या कसोटीतही त्याने महत्वपूर्ण धावा केल्या होत्या. पण दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच षटकात बोअरस्टोने संघासाठी महत्वाची जबाबदारी पार पाडली. लंडनमध्ये मागच्या काही दिवसांपारून तेल विरुधी आंदोलन सुरू आहे. आंदोलकांकडून त्याठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या महत्वाच्या कार्यक्रमांमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. लॉर्ड्स कसोटीत आंदोलकांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला.
लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्याच षटकात आंदोलक मैदानात धावत आले. ग्राउंड स्टाफ सुरक्षा रक्षक या आंदोलकांना पकडण्यासाठी तत्काळ मैदानात धावले. स्वतः यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोने एका आंदोलकाला उचलून घेतले आणि थेट सीमारेषेबाहेर घेऊन गेला. बेअरस्टोचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते आणि नेटकरी यावर वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1674001136947462144
दरम्यान, सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तत्पूर्वी पहिल्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली होती आणि पहिल्याच दिवशी डाव घोषित केला होता. पण ऑस्ट्रेलियापुढे त्यांची बॅझबॉल रणनीती अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले होते. दुसऱ्या सामन्यात इंग्लंड कशा पद्धतीने खेळणार, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. (Ashes 2023 lord’s test Jonny Bairstow man handling the protestors.)
महत्वाच्या बातम्या –
TNPLमध्ये मोठी चूक : डायरेक्ट हिटवर बाद झाला फलंदाज, तरीही अंपायरने घेतला नाही रिव्ह्यू, Video
मुथय्या मुरलीधरनला फुल गॅरेंटी! म्हणाला, वर्ल्डकपमध्ये रोहितचा ‘तो’ विक्रम मोडणे खूपच कठीण






