इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लॉर्ड्स कसोटी सध्या रंगात आहे. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसी स्टीव स्मिथने शतक करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 400 पार नेली. प्रत्युत्तरात इंग्लंड संघ फलंदाजी करत अशताना त्यांचा प्रमुख फिरकी गोलंदाज नेथन लायन याला दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले आणि तो मैदानातून बाहेर गेला. लायनची ही दुखापत ऑस्ट्रेलियन संघाची चिंता वाढवणारी ठरू शकते.
ऍशेस 2023 हंगामातील हा दुसरा सामना बुधवारी (28 जून) ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर सुरू झाला. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 5 बाद 339 धावा केल्या होत्या. स्टीव स्मिथ (Steve Smith) आणि ऍलेक्स केरी यांनी दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली. स्मिथने 184 चेंडूत 110 धावांची महत्वपूर्ण खेळी केली आणि संघाला 416 धावांपर्यंत घेऊन गेला. प्रत्युत्तरात इंग्लंडनेही धमाकेदार शुरुवात केली. दुसऱ्या सत्रात इंग्लंडची धावसंख्या एक बाद 145 धावा होती. पण शेवटच्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा महत्वाचा गोलंदाज नेथन लायन () दुखापतग्रस्त झाला. इंग्लंडच्या डावातील 37 व्या षटकात ही घटना घडली.
कॅमरून ग्रीनने टाकेलेल्या चेंडूवर सलामीवीर बेन डकेतने पूल शॉट खेळला. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला त्यावेळी लायन उभा होता आणि हा शॉट अडवण्याच्या प्रयत्नात त्याला ही दुखापत झाली. लायनची दुखापत ऑस्ट्रेलियन संघासाठी चिंतेची बाब आहे. कारण इंग्लंडमध्ये त्याची फिरकी गोलंदाजी संघासाठी फायद्याची ठरताना दिसली आहे. पहिल्या सामन्यातील दोन्ही डावांमध्ये लायनने प्रत्येकी चार-चार विकेट्स घेतल्या होत्या. दुखापतीनंतर लायनला व्यवस्थित चालता येत नव्हते. जर त्यांची दुखापत गंभीर निघाली, तर संपूर्ण ऍशेस 2023 हंगामातून त्याला माघार घ्यावी लागू शकते. ऑस्ट्रेलियन संघासाठी हा मोठा झटका असेल.
https://twitter.com/Dhivakar_25/status/1674448641665404928?s=20
लॉर्ड्स कसोटीतही लायन आपल्या फिरकीची जादू दाखवू लागला होता. पहिल्या डावात इंग्लंडच्या डावाची सुरुवात करण्यासाठी झॅक क्राउली आणि बेन डकेथ खेळपट्टीवर आले. पहिल्या विकेटसाठी या दोघांमध्ये 91 धावांची भागीदारी झाली. पण लायनच्या फिरकीमुळे ही भागीदारी अजून लांबली नाही. लायनने क्राउलीची विकेट घेत इंग्लंडला पहिला झटका दिला. (Ashes 2023 । Nathan Lyon injured in Lord’s Test)
महत्वाच्या बातम्या –
‘मी दिनेश कार्तिकला मनात नाही तसलं बोललो…’, भारत-पाक सामन्याबाबत अश्विनचा धक्कादायक खुलासा
प्रमुख निवडकर्ता म्हणून आगरकरच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब! दिल्ली कॅपिटल्सच्या जबाबदारीतून मुक्त