इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून (दि. 16 जून) सुरुवात झाली. या कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने आपला डाव घोषित केला. इंग्लंड संघाच्या बॅझबॉल पद्धतीने खेळण्याची चर्चा जगभरात सुरू आहे. अशातच ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड याने बॅझबॉल पद्धतीविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला आहे की, पहिल्या दिवसाचा खेळ दोन्ही संघासाठी बरोबरीचा राहिला. त्याच्यानुसार, ऑस्ट्रेलियाला बॅझबॉलशी कोणतीच अडचण नाहीये. कारण, त्यांनी जरी एका दिवसात डाव घोषित केला असला, तरीही त्यांच्या धावा 400पेक्षा कमीच आहेत.
काय म्हणाला हेजलवूड?
अनेक दिग्गज क्रिकेटपूटंचा विश्वास आहे की, इंग्लंड संघाचे पारडे जड आहे. मात्र, जोश हेजलवूड (Josh Hazlewood) याच्यानुसार, सामना बरोबरीत आहे. त्याने पहिल्या दिवसाच्या खेळानंतर म्हटले की, “तुम्हाला पाहावे लागेल की, त्यांची शेवटची धावसंख्या काय आहे. त्यांची धावसंख्या 400पेक्षा कमी आहे किंवा असे म्हणू शकतो की, ते 400वर सर्वबाद झाले आहेत. जरी त्यांनी या धावा 80 षटकात केल्या असतील किंवा 160 षटकात, परंतु धावा तर त्याच आहेत.”
“आम्हाला गोष्टींबाबत वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. आम्ही स्ट्राईक रेट आणि इकॉनॉमीची चिंता करण्याची गरज नाही. आम्हाला गोष्टी सामान्य ठेवाव्या लागतील आणि त्याचवेळी आम्ही पुढे जाऊ शकू. माझ्या मते, आम्ही त्यांना नियंत्रणात ठेवले आणि असे नाहीये की, त्यांनी खूपच वेगाने फलंदाजी केली आहे,” असेही पुढे बोलताना तो म्हणाला.
इंग्लंडचा पहिला डाव
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (England vs Australia) संघातील पहिल्या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 8 विकेट्स गमावत 393 धावा चोपल्या आणि डाव घोषित केला. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 14 धावा केल्या होत्या. यावेळी इंग्लंडसाठी जो रूट याने शानदार फलंदाजी करत 152 चेंडूत नाबाद 118 धावा केल्या. यामध्ये 4 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. इंग्लंडने आपला पहिला डाव 78 धावांवरच घोषित केला होता. ऑस्ट्रेलियाकडून नेथन लायन याने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या, तर हेजलवूड यानेही 2 विकेट्स घेतल्या. (ashes 2023 pacer josh hazlewood not overwhelmed with england s bazball style)
महत्वाच्या बातम्या-
WTC ट्रॉफी गमावल्यानंतर लंडनमध्ये पत्नी अनुष्कासह भजन ऐकायला गेला विराट, फोटोही जोरदार व्हायरल
संतापलेल्या आफ्रिदीचा पीसीबीला घरचा आहेर; अहमदाबाद खेळपट्टीविषयी म्हणाला, ‘तिथं काय आगीचा पाऊस पडतोय?’