---Advertisement---

Ashes 2023 : कधी, कुठे आणि कशी पाहता येईल इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियातील पहिली कसोटी मॅच? वाचा लगेच

On: शुक्रवार, जून 16, 2023 8:36 AM
ENG-vs-AUS
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा किताब जिंकल्यानंतर आता ऑस्ट्रेलिया संघ ऍशेस मालिका 2023 मध्ये यजमान इंग्लंडच्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. इंग्लंडच्या धरतीवर मागील 20 वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियासाठी ऍशेस मालिका खूपच कठीण ठरली आहे. 2001 नंतरपासून इंग्लंडमध्ये 5 वेळा ऍशेस मालिकेचे आयोजन झाले आहे, ज्यात 4 वेळा इंग्लंड संघाने विजय मिळवला आहे, तर 1 वेळा मालिका अनिर्णित राहिली. चला तर, ऍशेस मालिकेविषयी सर्वकाही जाणून घेऊयात…

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (England vs Australia) संघातील ऍशेस मालिका 2023मध्ये (Ashes Series 2023) एकूण 5 कसोटी सामने खेळले जाणार आहेत. हे पाच सामने 16 जून ते 31 जुलैदरम्यान पार पडतील.

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस मालिका 2023चा पहिला सामना केव्हा खेळला जाईल?
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस मालिका 2023चा पहिला सामना 16 ते 20 जूनदरम्यान खेळला जाईल.

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस मालिका 2023चा पहिला कसोटी सामना केव्हा सुरू होईल?
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस मालिका 2023चा पहिला कसोटी सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार, 3.30 वाजता सुरू होईल.

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस मालिका 2023 कुठे पाहता येईल?
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस मालिका 2023 भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस मालिका 2023ची लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?
क्रिकेटप्रेमी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस मालिका 2023ची लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह आणि जिओ टीव्हीवर पाहू शकतील.

ऍशेस मालिका 2023चे वेळापत्रक
जून 16 – जून 20 : पहिला सामना – एजबॅस्टन, बर्मिंघम
जून 28 – 2 जुलै : दुसरा सामना – लॉर्ड्स, लंडन
जुलै 6 – 10 जुलै : तिसरा सामना – हेडिंग्ले, लीड्स
जुलै 19 – जुलै 23 : चौथा सामना – ओल्ड ट्रॅफर्ड, मॅनचेस्टर
जुलै 27 – जुलै 31 : पाचवा सामना – द ओव्हल, लंडन

पहिल्या ऍशेस मालिकेसाठी इंग्लंड संघाची प्लेइंग इलेव्हन
बेन डकेट, जॅक क्राऊले, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक्स, मोईन अली, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, ओली रोबिन्सन

पहिल्या आणि दुसऱ्या ऍशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव स्मिथ, स्कॉट बोलँड, ऍलेक्स कॅरे, कॅमरून ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवूड, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नश लॅब्यूशेन, नेथन लॉयन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेविड वार्नर (ashes 2023 schedule when and where to watch see full list of fixtures squads dates and time live telecast in india)

महत्वाच्या बातम्या-
मोईनला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देताच संतापला इंग्लंडचाच माजी कर्णधार; म्हणाला, ‘मी स्टोक्स नाही…’
आशिया चषकापूर्वी ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूने तडकाफडकी घेतली निवृत्ती, 7 विश्वचषकात केलं देशाचं प्रतिनिधित्व

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---