---Advertisement---

लायनच्या जागी ‘हा’ गोलंदाज खेळणार ऍशेस 2023! एका मालिकेत विराटला चार वेळा धाडलंय तंबूत

On: शनिवार, जुलै 1, 2023 2:08 PM
Australia
---Advertisement---

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील ऐतिहासिक ऍशेस मालिका सध्या सुरू आहे. मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज नेथन लायन सलव 100 वा कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. पण सामन्याच्या दुसरी त्याला दुखापत झाली. अशात त्याची जागा घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या एका युवा गोलंदाजाचे नाव समोर येत आहे.

ऍशेस 2023चा पहिला सामना बर्मिंघमच्या एजबस्टन कसोटीत खेळला गेला, जो ऑस्ट्रेलियाने दोन विकेट्स राखून जिंकला. मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (28 जून) खेळला गेला. उभय संघांतील ही लढत रोमांचक बनली आहे. तिसऱ्या दिवसाच्या शेवटी ऑस्ट्रेलाय 221 धावांनी आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावात 2 बाद 130 धावा केल्या आहेत. असे असले तरी, त्यांना फिरकीपटू नेथन लायन (Nathan Lyon) याची कमी जानवू शकते. शेवडच्या डावात लायन नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाला नुकसान सोसावे लागू शकते.

लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दुखापत झाल्यामुळे लायनला मैदान सोडावे लागले. तिसऱ्या दिवशी तो वॉकरच्या सहायाने चालताना दिसला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर क्रिकेठ ऑस्ट्रेलियाकडून त्याची दुखापत थोडी गंभीर आहे, असे सांगितले गेले. मात्र, अजून किती दिवसांमध्ये लायन पुन्हा खेळताना दिसेल, याविषयी कुठलीच ठोस माहिती दिली गेली नाही. लॉर्ड्स कसोटी संपल्यानंतर लायन मालिकेतील पुढचे सामने खेळणार की नाही? हे समजू शकते. लायन जर ऍशेस 2023मधून बाहेर पडला, तर त्याच्या जागी कोण अशा सवाल चाहत्यांना पडला आहे.

ऍशेस 2023 साठी ऑस्ट्रेलियन संघात फिरकीपटू म्हणून नेथन लायनसोबत टॉड मर्फी (todd murphy) यालाही सामील केले गेले होते. 22 वर्षीय टॉड मर्फी लायनची जागा घेण्यासाठी सर्वात आघाडीवर असेल. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत मर्फीने जबरदस्त गोलंदाजी केली होती. याच मालिकेत त्याने कसोटी पदार्पण केले आणि तब्बप 14 विकेट्स घेतल्या. यादरम्यान विराट कोहली याला चार वेळा मर्फीने बाद केले. ऑस्ट्रेलियासाठी त्याने आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले आहेत आणि 14 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 25.21 आणि सरासरी 2.57 राहिली आहे. (Ashes 2023 spinner todd murphy may replace nathan lyon in ashes series )

महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! दिग्गज गोलंदाजाने केला भारताच्या मुख्य निवडकर्ता पदासाठी अर्ज, बीसीसीआयकडून पगारातही वाढ
महिला सीपीएल खेळणारी पहिली भारतीय खेळाडू; टीम इंडियाकडून खेळण्याआधी श्रेयांका पाटीलला संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---