इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने शनिवारी (17 जून) पहिल्या सत्रात कमाल केली. ऍशेस 2023 चा पहिला सामना बर्मिंघममध्ये खेळला जात आहे. इंग्लंडने पहिल्याच दिवशी डाव घोषित केल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. पण दुसऱ्या दिवशी स्टुअर्ट ब्रॉडचे प्रदर्शन पाहून चाहत्यांच्या शंका दूर झाल्या. ब्रॉडने लागोपाठ चेंडूंवर दोन विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाची वरची फली उध्वस्त केली.
ऍशेस 2023 () हंगामाची सुरुवात शुक्रवारी (16 जून) झाली. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवसी इंग्लंडने आपली बॅझबॉल रणनीती अमलात आणली. पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात इंग्लंडने 8 बाद 393 धावांवर डाव घोषित केला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 14 विकेट्स घेतल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मात्र पहिल्या ड्रिंक्स ब्रेकपूर्वीच इंग्लंडला दोन महत्वपूर्ण विकेट्स मिळाल्या. विशेष म्हणजे या दोन्ही विकेट्स इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने लागोपाठ चेंडूवर घेतल्या. सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) आणि मार्नस लाबुशेन (Marnus Labuschran) अनुक्रमे 9 आणि 0 धावांवर ब्रॉडची शिकार बनले.
दरम्यान, ब्रॉडने आपल्या कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक वेळा वॉर्नरला बाद केले आहे. वॉर्नर आपल्या कसोटी कारकिर्दीत 15 व्या वेळी स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर बाद झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 11 वे षटक इंग्लंडसाठी खऱ्या अर्थाने महत्वाचे ठरले. षटकातील पहिल्याच चेंडूवर ब्रॉडने वॉर्नरचा त्रिफळा उडवला. पुढच्या चेंडूवर लाबुशेनच्या रुपात नवीन फलंदाज खेळपट्टीवर आला होता. ब्रॉडने लाबुशेनला देखील गोल्डन डकवर तंबूत धाडले. या दोन विकेट्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या अवघी 29 असताना हे दोन मोठे झटके संघाला बसले.
England is the best place for Test cricket, What an atmosphere.
Incredible spell by Broad. pic.twitter.com/7X9X5QrWUO
— Johns. (@CricCrazyJohns) June 17, 2023
दरम्यान, उभय संघांतील या सामन्यासाठी मागच्या बऱ्याच दिवशांपासून चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. ब्रॉडचा वॉर्नरची विकेट मिळताच प्रेक्षकांनी मैदानात प्रचंड जल्लोष केला. ऍशेस 2023 (Ashes 2023) मध्ये प्रेक्षकांकडून खेळाडूंना मिळणारा प्रतिसाद देखील पाहण्यासारखा असणार आहे. (Stuart Broad took the wickets of David Warner and Marnus Labuschran off successive balls)
महत्वाच्या बातम्या –
धोनी बनला रणवीर सिंग! रांचीतील फार्म हाऊसवर दिसला कॅप्टन कूलचा अंतरंगी कूल, तुम्हीही पाहा
क्रिकेटपाठोपाठ राजकारणाच्या पीचवर रायुडू घेणार स्ट्राईक? CM जगनमोहन यांच्याशी वाढल्या भेटीगाठी