---Advertisement---

ASHES 2023 । ब्रॉडबाबत बोलताना अँडरसनला भावना अनावर, डोळ्यातून पाणी आल्याचा VIDEO व्हायरल

James Anderson
---Advertisement---

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस मालिकेचा शेवटचा सामना सोमवारी (31 जुलै) संपेल. हा सामना जिंकणे यजमान इंग्लंडसाठी महत्वाचे आहे, जेणेकरून संघ मालिकेत ऑस्ट्रेलियाची बरोबरी करू शकेल. इंग्लंडचा दिग्गज स्टुअर्ट ब्रॉड या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. चाहते आणि क्रिकेटच्या जाणकारांना ब्रॉडची ही घोषणा ऐकून धक्का बसलाच, पण त्याचा सहकारी जेम्स अँडरसनसाठी हा सर्वात मोठा धक्का होता. अशातच अँडरसनच्या एक व्हिडिओ समोर येत आहे, ज्यामध्ये तो ब्रॉडविषयी बोलताना भावूक झाल्याचे दिसते.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यायंच्यातील शेवटचा ऍशेस सामन केविंगटन ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या दिवशी विजयासाठी 249 धावा हव्या आहेत आणि 10 विकेट्स बाकी आहेत. अशात विजय ऑस्ट्रेलिय संघासाठी सोपा दिसत आहे. मात्र, दुसरीकडे इंग्लंडकडे जेम्स अँडरसन (James Anderson) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) या दिग्गजांची जोडीवर इंग्लंडसाठी सामना अनिर्णित किंवा जिंकण्याची जबाबदारी अशेल. इंग्लंडकडे इतरही चांगले गोलंदाज आहेत, पण सामन्याची दिशा पालटण्याची क्षणता या दोघांमध्ये. त्यातही हा सामना या जोडीसाठी महत्वाचा असणार आहे. कारण यानंतर कधी अँडरसन आणि ब्रॉड जोडी इंग्लंडसाठी एकत्र खेळताना दिसणार नाही. कारण अँडरसनने जरी निवृत्तीची घोषणा केली नसली, तरी त्याचा सहकारी ब्रॉड आपला शेवटचा सामना खेळत आहे.

याच पार्श्वभूनीवर जेम्स अँडरसनच्या डोळ्यात पाणी आल्याचे व्हायरल व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ जुना असून अँडरसन स्टुअर्ट ब्रॉडविषयी बोलत आहे. दोघांनी अनेक वर्ष इंग्लंडसाठी सोबत क्रिकेट खेळले असून, ते क्षण अँडरसनला आठवल्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी आल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळते. चाहतेही या व्हिडिओवर व्यक्त होत आहेत.

दरम्यान, उभय संघांतील या शेवटच्या ऍशेस कसोटीचा विचार केला, तर ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे. इंग्लंड संघ दुसऱ्या डावात 395 धावांवर सर्वबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 384 धावांचे लक्ष्य मिळाले. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियासाठी सरवामीवीर डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी नाबाद 135 धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी पहिल्या डावात इंग्लंडने 283, तर ऑस्ट्रेलियाने 295 धावा केल्या होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये एकत्र खेळताना सर्वाधिक 1037 विकेट्स गेणाऱ्या अँडरसन आणि ब्रॉडचे प्रदर्शन शेवटच्या डावात इंग्लंडसाठी महत्वाचे ठरेल. (ASHES 2023 । Talking about Broad, Anderson got emotional, tears came to his eyes)

महत्वाच्या बातम्या –
नाबाद 137 धावा करून एमआयला जिंकवणाऱ्या पूरनची रिएक्शन व्हायरल, पाहा एमएलसी 2023ची विनिंग मुव्हमेंट
कॅनडात चमकले महाराष्ट्राचे पठ्ठे! विजय चौधरी, राहुल आवारे आणि नरसिंह यादवचे सोनेरी यश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---